नवीन नांदेड l सामाजिक बांधिलकी जोपासत गेल्या अनेक वर्षांपासून नियमित दैनंदिन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसर साफसफाई व पाण्याने परिसर स्वच्छता ठेवणाऱ्या पाच मुस्लिम बांधव असलेल्या फुल विक्रेते यांच्या शिवजन्मोत्सव समिती व युवानेते ऊदयभाऊ देशमुख, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष रमेश ठाकूर यांच्या पुढाकाराने सत्कार करून शुभेच्छा देत सामाजिक बांधिलकी जोपासली.


सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छता व नियमित पुष्पहार घालणाऱ्या सिडको येथील मुस्लिम बांधव फुल विक्रेते शेख अझहर, शेख सय्यद वसिम,
शोएब खान,मजहर सय्यद, सय्यद नदीम यांच्या मनपाचे उपमहापौर विनय पाटील गिरडे,संजय पाटील घोगरे,ऊदयभाऊ देशमुख, माजी नगरसेवक संजय इंगेवाड ,सिध्दार्थ गायकवाड, राजु लांडगे, नवनाथ कांबळे,रवी थोरात,धिरज स्वामीराजन जोजारे, विनायक आकुरके, डॉ.करूणा जमदाडे, रवी रायभोळे,व सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती पदाधिकारी त्र्यंबक कदम,दिलीप कदम, साहेबराव गाढे,संकेत पाटील, विश्वास हंबर्डे , नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष रमेश ठाकूर ,पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शाल पुष्पहार घालून सत्कार केला.


हे पाच मुस्लिम बांधव असुन देखील नियमित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसर स्वच्छ ठेवणे, पुष्पहार अर्पण करणे हि नियमित सेवा बजावली आहे,या उल्लेखनीय कार्य कौतुकास्पद असल्याने नोंद घेऊन यांच्या सत्कार करण्यात आला.




