नांदेड l भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि समाजवादी क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची जयंती डीवायएफआय युवक संघटना आणि सीटूच्या वतीने रविवारी महापालिके समोर साजरी करण्यात आली.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे तरुण क्रांतिकारक म्हणून त्यांची ख्याती जगभर आहे.
पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी सीटू च्या वतीने २२ सप्टेंबर पासून नांदेड वाघाळा शहर महानगर पालिके समोर सीटू संघटनेचे बेमुदत साखळी उपोषण सुरु असून मागील वर्षी २११५ पूरग्रस्तांची अंतिम यादी व पंचनामे मनपाने तहसीलदार यांना सादर केले असून अद्याप पैसे वर्ग झाले नसल्याने उपोषणास सुरवात केली आहे.


तसेच संघटनेच्या वतीने नांदेड शहरातील पूरग्रस्तांची यादी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, महापालिका आयुक्त आणि तहसीलदार नांदेड यांना देण्यात आली असून त्या यादीतील पूरग्रस्तांच्या घराची गृहपाहणी करून अनुदान पात्र यादीत नावे समाविष्ट करावेत या आणि इतर मागण्यासाठी आंदोलन सुरु आहे. सीटू संघटनेने पूरग्रस्तांच्या रास्त मागण्यासाठी आतापर्यंत ४६ आंदोलने केली असून निधी खेचून आणला आहे.


या जयंती कार्यक्रमात डीवायएफआयचे तालुका अध्यक्ष कॉ.जयराज गायकवाड, जमसंच्या जिल्हाध्यक्षा कॉ.लता गायकवाड,सुभाषचंद्र गजभारे, इरवन्त सूर्यकार, बालाजी पाटील भोसले, दिगंबर घायाळे,राहुल नरवाडे आदींनी मनोगत व्यक्त केले आणि शहीद भगतसिंग अमर रहें च्या घोषणा देण्यात आल्या.


महापालिकेच्या वतीने शहीद भगतसिंग यांची जयंती केली नसेल तर करून घ्यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालया समोर मनपाच्या विरोधात निदर्शने करणार असल्याचा इशारा कॉ. जयराज गायकवाड यांनी दिला.


-कॉ.जयराज गायकवाड,
अध्यक्ष : डीवायएफआय नांदेड तालुका कमिटी.
मो. 7484158032
दि. 28 सप्टेंबर 2025


