मुखेड l मुखेड तालुक्यात सलग तीन ते चार वेळेस झालेल्या अतिवृष्टीने पुराने हाहाकार माजविला असून यात तालुक्यातील शेतीसह,जनावरे,घरांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे शासन शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार मदत देत असून ती मदत तुटपुंजी असून बाजूच्या पंजाब राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने तेथील पंजाब सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत जाहीर केली असून तशीच मदत व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने करावी अन्यथा दिनांक ६ रोजी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे शेतकरी पुत्र संघर्ष समितीने शेकडो शेतकऱ्यांसह तहसीलदार राजेश जाधव साहेब व पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.




