नांदेड l येथील होमगार्ड पथकातील सेवानिवृत्त होमगार्ड इंन्चार्ज केशव केदारे यांचा पोलीस स्टेशन बारड हद्दीतील रहिवाशी होमगार्ड यांच्या वतीने सहपरिवार सत्कार करून निरोप देण्यात आला.

भाग्यनगर जवळील होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या कवायत मैदानात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे हे होते.सेवानिवृत्त होमगार्ड इंन्चार्ज केशव केदारे यांचा समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे व कंपनी नायक डॉ. अशोक बोनगुलवार यांच्या हस्ते ड्रेस, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

त्यांच्या पत्नी सौ. सुमित्रा केदारे, व सुन सौ. कोमल प्रदिप केदारे यांचा सौ. दिपा बोनगुलवार यांच्या हस्ते साडी-चोळी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.



केदारे यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रदीप केदारे व कनिष्ठ चिरंजिव प्रविण केदारे यांचा देखाल यथोचित सन्मान करण्यात आला. सर्वांना पेढे भरऊन आनंद व्यक्त करण्यात आला.

यावेळी समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे, कंपनी नायक डॉ. अशोक बोनगुलवार, सत्कारमूर्ती केशव केदारे, प्रदीप केदारे यांची समयोचित भाषणे झाली. या कार्यक्रमास सौ. दिपा बोनगुलवार, कंपनी नायक रामराव क्षीरसागर,कंपनी नायक सुलतान बेग,कंपनी नायक स. बलबिरसिंघ चरणसिंघ,वरिष्ठ पलटन नायक रवि जेंकूट, वरिष्ठ पलटन नायक तथा अंशकालिन लिपिक बशिरोद्दीन शेख, वरिष्ठ पलटन नायक बळवंत अटकोरे,नरेंद्र जोंधळे,स.लड्डूसिंघ कारपेंटर,प्रदीप देशपांडे,अब्दुल रऊफ पिंजारी,स. रंजितसिंघ रागी, रविराज कोकरे, देविसिंह राजबन्सी, माधव गंधक वाड,रामेश्वर अवातिरक, गंगाधर सोनटक्के, शिवाजी धुते,संतोष पांडागळे,खंडू दळवी, निखिल राजमोरे, सहदेव भोकरे, सतिश खवास, दिपक कळणे, गोविंद गायकवाड, नागनाथ गंधकवाड, छाया वाघमारे, शिल्पा वाघमारे,उषा वाघमारे, सुहासिनी भद्रे, दिपाली एडके, साधना वाघोळे शोभा कोळी, यांच्यासह जवळपास चारशे महिला व पुरुष होमगार्ड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कंपनी नायक स. बलबिरसिंघ चरणसिंघ यांनी केले तर उपस्थितांचे आभार वरिष्ठ पलटन नायक बळवंत अटकोरे यांनी मानले. कंपनी नायक डॉ. अशोक बोनगुलवार यांच्या वतीने उपस्थित सर्व होमगार्ड यांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कंपनी नायक रामराव क्षीरसागर, व्यंकटी गिरे यांच्यासह बारड पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवाशी होमगार्ड यांनी परिश्रम घेतले.

