नांदेड। नेरली येथील साथरोग नियंत्रणात नेरली ता. जि. नांदेड येथे दुषित पाणी पिल्यामुळे मळमळ जुलाब व ऊल्टी आशा रुग्णांचा साथिचा उद्रेक झाला होता त्या ठिकाणी तात्काळ भेट देवून मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी प्रत्यक्ष भेट देवुन पाणी स्त्रोताची पाहणी केली. तात्काळ प्रभावी उपाय योजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सुचना दिल्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख आणी त्यांचा आरोग्य विभागाची संपुर्ण टीम तळ ठोकुन आहेत.
सर्वजनिक पीण्याच्या पाण्याचे स्त्रोताचे सर्व विहीर, हातपंप व बोर व नळ योजना पाण्याची टाकी यांचे बिल्चींग पावडर व्दारे पाणी शुध्दीकरण करण्यात आले आहे. १७ पाणी नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. बिल्चींग पावडरचा एक नमुना प्रयोगशाळे मध्ये तपासणी साठी पाठविण्यात आला आहे. अनुजैविक व रासायनिक तपासणीसाठी भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणा प्रयोगशाळा वर्कशाप नांदेड व जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा नांदेड येथे पाठविण्यात आले आहे.
आरोग्य विभाच्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत ग्रह भेटी व्दारे रुग्ण शोध मोहिम सुरु केली आहे. ज्या कुटुंबा मध्ये मळमळ जुलाब व उल्टी या सारखे लक्षणे रुग्णास दिसुन आल्यास रुग्णास आरोग्य उपकेंद्रामध्ये उपचार सुरु करण्यात आले आहे. गावातील नागरीकांना पाणी पुरवठा टॅन्कर व्दारे सुरु करण्यात आले आहे ते पाणी शुध्द आहे कींवा नाही याची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांनी स्वतः ओटी टेस्ट करून खात्री करत आहेत.
नेरली येथिल आता पर्यंतच्या रुग्णांची संख्या ३४४ आहे. यापैकी रेफर २१० पैकी जिल्हा रुग्णालय ९४, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ८९, नबोदय हॉस्पीटल २७ रुग्ण आहेत. नेरली येथिल परिस्थिती नियंत्रणात येत आहे या कडे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत त्याचा मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख, सहाय्य जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सुर्यवंशी गट विकास अधिकारी नारवटकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रबिन मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री खंडकर, डॉ. बालाजी मीरकुटे, समुदाय आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत पद अधिकारी व कर्मचारी साथ नियंत्रणासाठी परिश्रम घेत आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी नगरीकांना आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातुन अहवान केले आहे. नागरीकांनी पाणी गाळुन ऊकळुन प्यावे, शिळे अन्न व उघडयावरचे अन्न खाऊ नये, जेवनापुर्वी व स्वच्छालयाला जाऊन आल्या नंतर साबनाने हात स्वच्छ धुवावे. मुंलाना जेवन भरवण्यापुर्वी हात स्वच्छ धुवावे, स्वयंपाक करण्यापुर्वी महिलांनी हात स्वच्छ धुवावे. स्तनदा माता व गरोदर माता अंगणवाडीतील सॅम व मॅम मुले व मुली व लाहान मुले यांचे तपासणी करण्यात येत आहे. मळमळ उलटी जुलाब यासारखे लक्षणे दिसुन आल्यास नागरीकांनी आरोग्य कर्मचारी व आरोग्य उपकेंद्राशी संर्पक करावे.