नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘एक पेड मां के नाम’ या योजनेअंतर्गत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग, ललित व प्रयोगजिवी कला संकुल आणि उद्यान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक पेड मां के नाम’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आई विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शासकीय स्तरावरून ‘एक पेड मां के नाम’ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत ललित व प्रयोगजिवी कला संकुलाच्या परिसरामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्यासह अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या हस्ते फळझाडे लावण्यात लावून वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी वित्त व लेखाधिकारी मोहम्मद शकील, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, ललित व प्रयोगजिवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, प्रा. डॉ. सुहास पाठक, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनायक जाधव, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, उपकुलसचिव रामदास पेदेवाड, एफटीआयआयचे प्रा. मेघवरूण पंत, प्रा. साक्षी आर्या व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. किरण सावंत, प्रा. राहुल गायकवाड, प्रा. नामदेव बोंपिलवार, प्रा. प्रशांत बोंपिलवार, प्रा. कैलास पुपुलवाड, प्रा. शिवराज शिंदे, प्रकाश रगडे, निशिकांत गायकवाड व संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.