उस्माननगर| शिक्षणाने माणूस घडतो , आणि साहित्याने समाज घडतो. तर साहीत्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य लेखनीने सुसंस्कृत समाज घडला असे मत प्रा.डॉ.वैजनाथ अनमुलवाड (. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा शास्त्र विभाग) यांनी आपले मनोगतातून व्यक्त केले.
कंधार तालुक्यातील उस्माननगर येथे दि .२२ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न ,लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सकाळी छ.शिवाजीमहाराज, क्रांतीविर उस्ताद लहूजी साळवे , डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .त्यानंतर क्रांतीध्वजाचे ध्वजारोहण उस्माननगर पोलीस स्टेशनचे पोलीस जमादार निल्लप्पा शिवपुजे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जयंती मंडळाकडून मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ.शोभाबाई शेषेराव काळम होत्या , तर विशेष अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या प्रा.डॉ. सौ .मनिषा पुरुषोत्तम धोंडगे होते.तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ. वैजनाथ अनमुलवाड होते.
प्रमुख पाहूणे म्हणून सम्राट अशोक प्राथमिक शाळेचे संचालक तथा अध्यक्ष देवराव सोनसळे, कंधार पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती लक्ष्मीबाई व्यंकटराव पाटील घोरबांड, चेअरमन रूद्र उर्फ संजय वारकड , पोलीस पाटील विश्वभंर मोरे ,ग्रामपंचायत सदस्य कमलाकर शिंदे ,ग्रामपंचायत सदस्या रेखाताई भिसे ,सम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक राहुल सोनसळे ,सामाजिक कार्यकर्ते बाबाराव पाटील शिंदे हाळदेकर ,दत्ता घोरबांड ,माजी जि.प.सदस्य माधव भिसे ,गोविंद भिसे ,पत्रकार देविदास डांगे,पत्रकार लक्ष्मण कांबळे , पांडागळे सर ,मुख्याध्यापक शेख , मुख्याध्यापिका सौ.विद्या वांगे , जि.प. के. प्रा शाळेचे मुख्याध्यापक खान सर ,श्रीराम काळम , गोविंद घोरबांड ,गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थितीती होती.सर्व प्रथम सम्राट अशोक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या गितावर व देशभक्तीपर गितावर लेझीमच्या तालावर सादरीकरण पाहुण पालक भारावून जाऊन लेकराचे कौतुक केले.
यावेळी प्रा . डॉ . अनमुलवाड मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले , समाजात सांस्कृतिक द्रष्ट्या संपन्नता आणण्यासाठी अण्णाभाऊनी आपल्या लेखणीतून वेगळा मार्ग निर्माण केला .कथा ,कविता ,कादंबरी, प्रवास वर्णन आणि पोवाड्यामधून क्रांतीगिरी चरित्रे उभे केले .स्त्रीयांना नायक्तव देण्याचे हद्य कार्य अण्णाभाऊनी केले,शिकलेला समाज साहीत्य वाचल्याने सुसंस्कृत घडतो त्यासाठी आजच्या तरूणांनी शिक्षणाकडे वळावे असे प्रा.डॉ. वैजनाथ अनमुलवाड म्हणाले .
यानंतर अनेकांनी मार्गदर्शन केले त्यानंतर अण्णाभाऊ साठे जयंती मंडळाकडून प्रा.डॉ. सौ मनिषा पुरुषोत्तम धोंडगे यांच्या व मान्यवरांच्या हस्ते समाजातील गुणवंत विद्यार्थी श्री रूपेश भिसे यांची पि.एच .डी पदवीसाठी निवड झाल्यामुळे , सुरज शेळके ( रायगड पोलीस ),सोमनाथ कांळे ( छ.संभाजीनगर ( पोलीस ) वेदांत भिसे ( आरोग्य सेवक ),सम्यक कांबळे ( बालवैज्ञानिक ) दहावी परीक्षेत केंद्रातून मागासवर्गीय मुलीमधून सर्व प्रथम आलेली साक्षी वंजारे , आरोही गंगाधर भिसे वर्ग ३ रा ( श्रीया इंटलिजेट ॲकेडमी सर्च केंद्रात प्रथम ) सर्वेश्वर भिसे (श्रेया इंटलिजेट ॲकेडमी सर्च केंद्रात ४ था या सर्वानां ” समाज गौरव २०२४ ” हा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
दुपारच्या सत्रात लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची मिरवणूक अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहापासून गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. या मिरवणुकीत अण्णाभाऊ साठे यांचे अनुयायी या मिरवणुकीत मोठ्याप्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.नागन भिसे यांनी केले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सचिव , कार्यकारणी मंडळी व अण्णाभाऊ साठे विचार मित्र मंडळ अनुयानी परिश्रम घेतले.