नांदेड| वंचित बहुजन आघाडीचे हिमायतनगर तालुक्याचा ढाण्या वाघ, भारिप बहुजन महासंघाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडी माजी तालुकाध्यक्ष, तालुका संघटक इत्यादी पदावर राहून सामाजिक काम करणारे डॉक्टर रविराज दूध कावडे यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्टींने त्यांची नांदेड उत्तर जिल्हा महासचिव पदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीने आगामी विधानसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारास मोठा फायदा होणार आहे.
हिमायतनगर तालुका अध्यक्ष पद गेल्यानंतरही डॉक्टर रविराज दूध कावडे यांनी पक्षावर निष्ठा ठेवून कायमस्वरूपी वंचित बहुजन आघाडी तालुक्यांमध्ये कशी वाढेल याकडे लक्ष केंद्रित करून काम सुरु ठेवले. अविरत काम करताना ना पदाचा लोभ, ना मोठेपणाचा आव न करता बाळासाहेबांचा आदेश हीच आपल्या कामाची कार्य दिशा समजून सतत वंचित वंचित बहुजन आघाडी वाढीसाठी झटत राहिले. त्यांच्या याचा कामाची दखल पक्षश्रेष्टींने घेतली असून, नांदेड जिल्हाचा ढाण्या वाघ प्रचंड स्वाभिमानी बहुजनाचे कैवारी आदरणीय श्रेदेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू नांदेड जिल्हा अध्यक्ष राजेश्वर हतीअंबिरे पालमकर यांच्या शिफारशीवरून डॉक्टर रविराज दूध कावडे यांची निवड करण्यात आली आहे.
डॉक्टर रविराज दूध कावडे यांनी हिमायतनगर तालुक्यात गाव तीथ शाखा ,धरणे आंदोलन यांच्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. त्यांच्या कामाची दखल घेऊन वरिष्ठ स्तरावर त्यांना पुनश्च एकदा नांदेड जिल्ह्याचा नांदेड उत्तर जिल्हा महासचिव पदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल वंचितच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व स्तरातून त्यांचा अभिनंदन केले जात आहे.