नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी शनिवार दिनांक 3 आँगस्ट रोजी भोकर तालुक्यातील मातुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली. या भेटीत त्यांनी आरोग्य केंद्राच्या कार्याची पाहणी केली आणि आरोग्य कर्मचारी व रुग्णांसोबत संवाद साधला. डॉ. देशमुख यांनी आरोग्य केंद्राच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रसूत झालेल्या मातेस भेट देऊन आस्थेने विचारपूस केली. याप्रसंगी त्यांनी मातांचे आणि बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या माता बालसंगोपन कार्यक्रमाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा कार्यक्रम गर्भवती महिलांना आणि लहान मुलांना आवश्यक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
यामध्ये नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण, पोषण शिक्षण, स्वच्छतेबद्दल जागरूकता आणि मानसिक आधार अशा विविध सेवांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगिता देशमुख यांनी आरोग्य केंद्राच्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.