नांदेड,गोविंद मुंडकर| विधानसभा निवडणूकीची आता केवळ घोषणा होणे शिल्लक आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार अंतिम टप्प्यात प्रचार यंत्रणेत गुंतलेले आहेत. नांदेड जिल्ह्यातील विविध मतदारसंघात प्रचार करणे आणि पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारीसाठी संपर्क करणे, यात प्रत्येक पक्षात रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक असलेले उमेदवार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पावडे यांनी विविध लक्षवेधी उपक्रम व आंदोलने राबवून प्रचार तंत्र अनेक अपेक्षा भिन्न असल्याचे स्पष्ट केले 5000 घड्याळ वाटपाचा उपक्रम खर्च उमेदवाराचा चर्चा प्रचाराची सुरू आहे. नांदेड उत्तर मतदारसंघात चित्र रंगात आले आहे. राजेश पावडे यांच्या प्रचार यंत्रणेमुळे हर घर काँग्रेसचा पंजा पोहोचला आहे.
विधानसभा निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने प्रत्येक इच्छुक उमेदवार प्रचंड धावपळ करत मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी घेत आहे. दरम्यान नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या वतीने अनेक जण इच्छूक असले तरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पावडे यांनी अनेक लक्षवेधी उपक्रम व आंदोलने राबवून मतदारसंघात प्रचार यंत्रणेत आघाडी घेतली आहे. आगदी लोकसभा निवडणुकीपासूनच राजेश पावडे यांनी जनसंपर्क करण्यावर अधिक भर दिला आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसला जवळपास चाळीस हजार मताधिक्य होते. यात राजेश पावडे यांचा देखील महत्त्वाचा वाटा आहे असे बोलले जाते. लोकसभा निवडणुकीपासून ते आजलगत राजेश पावडे यांनी विविध उपक्रमातून व आंदोलनातून जनसंपर्क सुरुच ठेवला आहे. स्पर्धा परीक्षा व विविध भरती परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने राजेश पावडे यांच्या वतीने युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
शहरी भागासह विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी यांना पाऊस व ऊनात मदत व्हावी म्हणून राजेश पावडे यांनी उत्तर विधानसभा मतदार संघात पस्तीस ते चाळीस हजार छत्र्यांचे मोफत वाटप करणे आजही सुरुच ठेवले आहे. रस्ते, मुलभूत सोईसुविधा, वाहतूक कोंडी, वीजपुरवठा यासंदर्भात नागरिकांच्या समस्या चिठ्ठी स्वरूपात खोक्यात घेऊन मुख्यमंत्री कार्यालयास पाठवण्याचा उपक्रम राजेश पावडे यांनी खोके आंदोलनाच्या माध्यमातून हाती घेतला होता. विशेषतः उत्तर विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झालेले असताना प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजेश पावडे यांनी खड्डे मोजा बक्षिसे जिंका ही अनोखी स्पर्धा राबवत, विजेत्यांना पारितोषिके वाटप केली. यास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. उत्तर विधानसभा मतदारसंघातील नाभिक समाज बांधवांच्या प्रतिष्ठानासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व स्व. खा. वसंतराव चव्हाण यांची प्रतिमा असलेल्या तब्बल पाच हजार घड्याळ वाटपाचा उपक्रम राजेश पावडे आज देखील राबवत आहेत.
याच बरोबर पंढरपूर येथील आषाढी एकादशी निमित्ताने विशेष रेल्वे सोडण्याची मागणी असो की छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी निषेध आंदोलन असो किंवा अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सर्व महसूल विभागाचे पंचनामे करून तात्काळ व सरसकट मदत करण्याची मागणी असो काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पावडे यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला आहे. मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीच्या आयोजनापासून ईद ए मिलादुन्नबी मिरवणूकी दरम्यान अल्पोपहार वाटप करण्याचे कार्यक्रम त्यांनी आयोजित केले. तर गणेश उत्सवा दरम्यान महाआरतीसह अनंत चतुर्दशीला महाप्रसादाचे आयोजन करत सामाजिक उत्सवात देखील त्यांनी सहभाग घेतला. सध्या सुरू असलेल्या दुर्गादेवी महोत्सवात आरतीसाठी राजेश पावडे यांची सर्वत्र उपस्थिती आहे. परिणामी उत्तर विधानसभा मतदारसंघात प्रचारात काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश पावडे यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. प्रचाराची चर्चा आणि उमेदवाराचा खर्च.याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.