नांदेड| खोटी माहिती देवून व खोटया नंबर प्लेटचा वापर करुन फसवणुक करत धर्माबाद येथील एका व्यापा-याचे ५९५ हरभ-याचे पोते भरलेला ट्रकचा अपहार करणा-या आरोपीना धर्माबाद पोलीसांनी अवघ्या ४८ तासात जेरबंद केले आहे. या घटनेने खोटी माहिती सांगून फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारात खळबळ उडाली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे दि.२८ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १९.३० ते २१.३० वाजेच्या दरम्यान गुन्हयातील आरोपींनी फिर्यादीना जालना येथील एका ट्रकचा खोटा नंबर सांगून व ट्रकला खोटी नंबर प्लेट लावून नागपूर येथील भाडे घेतले. त्यात ५९५ हरभ-याचे पोते किंमत १६ लक्ष ६९ हजार १५० रूपयाचा माल ट्रकमध्ये भरून नागपूर येथील व्यापा-याला न देता अपहार करुन फसवणुक केल्या प्रकरणी पोलीस स्टेशन धर्माबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याचे आदेश धर्मबाद पोलिसांना केले होते. त्यावरून आरोपीचा शोधात तीन पथके तयार करण्यात आली. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सायबर सेल, गुप्त बातमीदार व सिसीटीव्ही फूटेज च्या आधारे अवघ्या ४८ तासात आरोपी प्रभाकर विश्वनाथ घुगे, वय ४० वर्ष ट्रकचालक रा. मुळगाव वाई ता. सेलु जि. परभणी ह.मु खैरी प्लाट जितुंर ता. जिंतुर जि. परभणी, बालाजी खुशाल जायभाये, वय २८ वर्ष मजुरी रा. अंगलगाव ता. जिंतुर जि. परभणी आणि बचन पंढरीनाथ घुगे वय ५३ वर्ष रा. अंबरवाडी ता. जिंतुर जि. परभणी याना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १०० टक्के मूदेमाल जप्त करून उल्लेखनिय कामगिरी केली आहे. याबद्दल पोलिसांचे अभिनंदन होते आहे.

हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराय धरणे, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक, नादेड, संकेत गोसावी, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देगलुर चार्ज धर्माबाद, बाळासाहेब रोकडे, पोलीस निरीक्षकधर्माबाद, धिरज चव्हाण पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन नादेड यांचे मार्गदर्शनाखाली बालाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्रीमती प्रियंका पचार, महिला पोलीस उप निरीक्षक, विलास मुस्तापुरे, पोलीस हवालदार, महेश माकुरवार, पोलीस हवालदार, संतोष संगेवार, पोलीस हवालदार, सचिन गडपवार, आमेश्वर नागुलवाड, पोलीस शिपाई, राजेंद्र सिटीकर, पोलीस हवालदार सायबर पोलीस स्टेशन नादेड, दिपक ओढणे पोलीस हवालदार, सायबर पोलीस स्टेशन नादेड यांनी केली आहे.
