हिमायतनगर। भगवंताच्या नाम स्मरण पुजे बरोबर सर्वांनी आई वडीलांचा सन्मान, आदर करत मनोभावे सेवा करावी यातच भगवत भक्ती आहे असे मौलिक विचार पिंपळगाव दत्त संस्थानचे गोवत्स बालब्रह्मचारी व्यंकटस्वामी महाराज यांनी व्यक्त केले ते किरमगाव येथे श्री साईनाथ मंदिराच्या वार्षीक उत्सवा निमित्त भक्तांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.


पुढे बोलतांना व्यंकटस्वामी महाराज म्हणाले, आई वडील जन्म देतात लहानाच मोठ करतात ज्यांच वय झाल तेही आणि उपस्थित तरूणांनी आई वडीलांच्या कष्टाची मेहनतीची जाणीव ठेवुन त्यांना उलट बोलु नये त्यांच्या मनाविरूध्द काम न करता निर्व्यसणी राहुन मदत करावी चांगल्या गुणांचा अंगीकार करून कुटूंबाची प्रगती साधावी.

श्री साईबाबाच्या वार्षिक उत्सव एकत्रीत येवुन चांगल्या पध्दतीने करत असल्या बद्दल महाराजांनी कौतुक करून अभिनंदन केल. पिंपळगाव येथिल महाशिवपुराण कथे दरम्यान किरमगाव येथिल ग्रामस्थ भक्तांनी दातृत्वा सोबतच जल सेवेचा वसा पुर्ण केला त्यांनी केलेल्या सेवे बद्दल महाराजांनी आशिर्वाद देवुन सर्वकाही भगवंताने करून घेतल आपण निमित्त होतो असे म्हणत किरमगाववाशियांच्या सुखी आनंदी जीवनासाठी प्रार्थणा केली. या कार्यक्रमासाठी किरमगाव येथिल महिला बालक, पुरूष भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
