नांदेड,बिलोली, गोविंद मुंडकर। इंग्रजी माध्यमांच्या शाळातील मराठी अमृतवाणी हे पुस्तक यातील चुका यामुळे पालक आणि विद्यार्थी यासह शिक्षकात गोंधळ निर्माण झाला आहे. इयत्ता तिसरीच्या अमृतवाणी यातील *कुशाग्र राजा* या पाठातील प्राण्यांच्या आवाजाच्या जोड्या जुळवा यातील दोष शिक्षण विभागाने का दूर केले नाही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गाढवाच्या ऐवजी म्हशीचा उल्लेख करून शिक्षण क्षेत्रातील गाढवाचा गोंधळ चर्चेला आला आहे.
विद्यार्थी, विद्यार्थिनींना मराठी शिक्षण आणि त्याविषयीचे ज्ञान सुलभ पद्धतीने अवगत करण्यासाठी विविध संशोधन केले जातात. शिक्षण विभागाच्या नाकर्तेपणामुळे आणि राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे इंग्रजी माध्यमातील मराठी विषयाच्या अमृतवाणी पुस्तकात त्रुटी नव्हे तर अनेक दोष आढळून आले आहेत.
राज्य प्रकल्प समन्वयक श्री भाऊ गावंडे यांनी महाराष्ट्र शासन यांच्यावतीने युनिसेफ उपक्रमांतर्गत गुडलक प्रकाशनाच्यावतीने इयत्ता तिसरी साठी प्रकाशित केलेले अमृतवाणी हे पुस्तक सदोष असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. या पुस्तकातील पाठ क्रमांक दोन *कुशाग्र राजा* यातील *प्राण्यांच्या आवाजाच्या जोड्या जुळवा* या प्रश्नातील आवाजाची नावे आणि प्राणी हे पूर्णतः सदोष आढळून आले आहे. पाठावर आधारित प्रश्न अपेक्षित असताना पाठात नसलेल्या म्हशीचा या प्रश्नात समावेश करण्यात आला.
मुखपृष्ठावर पाठावर आधारित प्रश्न, श्रवण कौशल्य, व्याकरण विषय विज्ञान हे सुस्पष्ट करण्यात आले. पाठात मात्र कुठेही उल्लेख नसलेल्या, नसलेल्या म्हशीचा यात उल्लेख करण्यात आला. उल्लेख असलेल्या गाढवाच्या आवाजाला वगळण्यात आले. सदोष असलेल्या *प्राण्यांच्या आवाजाच्या जोड्या जुळवा* यातील दोष तातडीने दूर करावे. अशी मागणी प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर यांनी शिक्षण मंत्री आणि शिक्षण संचालक यांच्याकडे केली आहे.