नांदेडक्राईम

Murder in rural police station limits for the third day | ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत तिसऱ्या दिवशीही खुन -NNL

नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत तिसऱ्या दिवशी खुनाची घटना बळीरामपुर भागात घडली असुन तिसऱ्या दिवशी अमोल लांडगे या २३ वर्षिय तरूणाच्या खंजरने छातीवर पोटावर व पाठीवर वार करून मारहाण केली यात तो गंभीर जखमी झाला असून उपचार दरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला असून या प्रकरणी तिन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भेट देऊन तिन्ही घटनेचा आढावा घेतला आहे.

या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी लिबांजी लांडगे रा.गौतमी नगर बळीरामपुर नांदेड 17 जुलै 24 रोजी सायंकाळी 7.15 वाजताचे सुमारास मी घरी असतांना आमच्या शेजारी राहणा-या छोट्या मुलाने घरी येवुन मला सांगितले की, तुमचा मुलगा नामे अमोल लांडगे यास दोघे-तिघे इसम खंजरने मारत आहे असे सांगितले तेव्हा मी व माझी पत्नी पळत गौतमी नगर बळीरामपुर येथील किराणा दुकाना समोर गेलो असता दुकानाच्या समोरुन माझा मुलगा आमोल उर्फ भैयासाहेब यास आकाश उर्फ मटक्या मल्हारी जोगदंड, दिपक उर्फ गोगल्या सुभाष गोडबोले, शंतनु नंदकिशोर डेहाने यांनी पकडुन गल्लीत नेले.

माझा मुलगा अमोल यासआकाश उर्फ मटक्या व गांगल्या यांच्या हातातील खंजरने त्यांनी माझ्या मुलाच्या छातीवर,पाठीत व पोटात वार करुन गंभीर जखमी केले व शंतनु याने पकडुन ठेवुन तिघांनी मिळून लाथाबुक्याने मारुन आम्हाला येतांना पाहुण अमोलला तेथेच जखमी अवस्थेत सोडून पळुन गेले. त्या ठिकाणी आमचे गल्लीतील सहकारी यांच्या मदतीने आम्ही ऑटोमध्ये टाकुन माझ्या मुलाला घेवून सरकारी दवाखाना विष्णुपुरी येथे उपचारासाठी दाखल केले त्याचेवर तेथिल डॉक्टरांनी उपचार सुरु केला,काही नंतर डॉक्टरांनी आम्हाला येवून सांगितले की,तुमचा मुलगा मरण पावला आहे.

17 जुलै 24 रोजी वेळ सायंकाळी 7.15 वाचे सुमारास गौतमी नगर बळीरामपुर येथील किराणा दुकाना समोर गल्ली येथे जुन्या वादाच्या कारणावरून ऑकाश उर्फ मटक्या मल्हारी जोगदंड ,दिपक उर्फ गोगल्या सुभाष गोडबोले, शंतनु नंदकिशोर डेहाने सर्व रा.बळीरामपुर नांदेड यांनी माझा मुलगा नामे अमोल रामेश्वर लांडगे वय 23 वर्ष रा.गौतमी नगर बळीरामपुर नांदेड यास खंजरने छातीवर,पोटावर व पाठीवर वार करुन व लाथाबुक्याने मारहाण करुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले आहे अशी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी तिन जणांविरुद्ध कलम १०३/१,११५/२, ३/५, ४,२५,२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने हे अधिक तपास करत असुन तिन जणांना अटक केली आहे. सलग तीन दिवस झालेल्या खूनाचा घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे व अतिरिक्त पोलीस अधीक्षक,यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भेट देऊन तिन्ही घटनेचा आढावा घेतला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button