श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। माहूर येथील न्यायालयाच्या काही अंतरावर एक कोल्हा मृतावस्थेत आढळून आला असल्याने वन्यप्रेमीनी नाराजी व्यक्त करीत ‘वन विभाग’ झोपेचे सोंग घेते की काय ? असा प्रश्न नागरिक व वन्यप्रेमीनी केला आहे.तर अन्नपाणी मिळाले नसल्याने त्या कोल्ह्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविला असून वनविभाग अजुन किती मुक्या प्राण्यांचे जीव घेणार ? असा संतप्त सवाल वन्यप्रेमीनी केला आहे.
माहूर तालुक्यात वनसंपदेचा होणारा ऱ्हास बघता वन्यजीवांचा सुरक्षित अधिवास धोक्यात आला आहे. आता त्यांचे हक्काचे घरच सुरक्षित राहिलेले नाही. तृणभक्षक प्राण्यांची व जंगलातील पाणवठ्यांची संख्या घटल्यानेही भक्ष्याच्या शोधात हे वन्यजीव आपला मोर्चा गाव आणि शहरांकडे वळवित असल्याचे अनेक उदाहरण आहे.अशातच वनपरिक्षेत्र कार्यालय मांडवी अंतर्गत सारखणी घाटातील जंगलातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वन तपासणी नाक्याच्या काही अंतरावरच अज्ञात वाहनाच्या धडकेत दि.२७ आॅक्टो रोजी राञी सुमारे ८:३० ते ९ च्या दरम्यान बिबट्या जातीच्या वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गावाकडे येणाऱ्या या वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. माहूर वन क्षेञातील अनेक भागात बिबट्यांचा वावर असल्याचे पुरावे मिळाले आहेत.
मात्र, गेल्या काही वर्षांत ओसाड होणारी जंगले, त्यामुळे तृणभक्षक प्राण्यांची घटती संख्या यामुळे हे भुकेने व तहानेने व्याकूळ झालेले बिबटे मनुष्यवस्तीकडे वळले आहेत. त्यामुळे आता मानव व वन्यजीव हा संघर्ष नित्याचा झाला आहे.अशातच माहूर न्यायालयाच्या काही अंतरावर एका कोल्हाचा तोंडातून फेस जावून मूत्यु झाल्याची घटना घडली असून कोल्ह्याच्या तोंडातून फेस आला असल्यामुळे प्रत्यक्षदर्शनी बघणार्या नागरिकांनी अनेक तर्क वितर्क लावत कोल्ह्याने जंगलात किंवा शेतात विषारी अन्न खाले असेलतर तो तिथेच मुर्तुमुखी पडला असता.
पण तो गावा शेजारी येऊन मृत्युमुखी पडला असल्यामुळे कुठे तरी संशयाची पाल चूकचूक करीत असल्याची चर्चा असून माहूर वनविभाग प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर शंका घेतली जात आहे.या संशयीत मृत कोल्हाच्या मृत्यू बाबत वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता त्यांनी संपर्क जोडून घेतला नसल्याने या प्रकराणाची अधिकची माहिती मिळू शकली नाही.