नांदेड| भारतीय जनता पार्टी उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने दि. 28 ऑगस्ट रोजी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण तेलंगणा येथील हिंदू शेरनी भाजपा नेत्या माधवी लता हे राहणार असून त्यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. नांदेड शहरातील बी. के. हॉल समोरील श्रीनगर परिसरात दि. 28 ऑगस्ट रोजी हा दहीहंडी महोत्सव होणार आहे.


या महोत्सवास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार अजित गोपछडे, माजी खासदार तथा लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या दहीहंडी महोत्सवात गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख मिलिंद देशमुख, भाजपा जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड, मंडळ अध्यक्ष आशिष नेरलकर, सुनील राणे, बंडू पावडे , आनंदा पावडे, शिवा नागरगोजे यांनी केले आहे.




