श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| विद्यार्थ्यांना बालवयात वाचनाची गोडी निर्माण व्हावी. वाचाल तर वाचाल हे ध्येय उराशी बाळगून. वाचनाचे त्यांच्या मनावर संस्कार निर्माण व्हावेत. हा प्रेरणादायी हेतू ठेवून विद्यार्थ्यांनी जीवनभर वाचन केले पाहिजे. वाचनामुळे संस्कारक्षम विद्यार्थी घडू शकतो. म्हणून वाचन ही लोक चळवळ व्हावी. वाचन हे प्रगतीचे लक्षण व सर्वांगीण विकासाचा पाया असल्याने विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासणे ही काळाची गरज असल्याचे मत उपक्रमशील जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक शेषराव पाटील यांनी व्यक्त केले.
वाचन हे ज्ञानार्जनाचे एक साधन आहे. तसेच वाचन ही जीवनभर पुरणारी शिदोरी आहे. अशा या वाचनाचे महत्त्व सांगणारा ‘वाचन प्रेरणा दिन माहूर शहरातील नवी अबादी जिल्हा परिषद शाळेत आज दिनांक १५ रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. वाचाल तर वाचाल’, ‘शिकाल तर टिकाल’, ‘ज्ञानाची पाहिजे खात्री, तर पुस्तकांशी करा मैत्री’ या संकल्पना यावेळी उदाहरणे देऊन स्पष्ट करण्यात आल्या.
शिक्षक व विद्यार्थी यांनी पुस्तकांचे वाचन केले. तसेच हात धुवा दिवस निमित्त विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष करून दाखविले आहे.यावेळी शाळेतील उपक्रमशील जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षक शेषराव पाटील व मुख्याध्यापिका ललिता जोशी, फॅन्सी नखाते, मुजीब शेख त्यांची उपस्थित होती.