नांदेड। जिल्हयात चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन कार्यवाही करणे कामी पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार साहेब यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते.
स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी पोउपनि साईनाथ पुयड यांचे पथकाला नांदेड जिल्हयात चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आनणे बाबत आदेशीत केले होते. त्यावरुन दिनांक 27/09/2024 रोजी श्री साईनाथ पुयड पोउपनि स्थागुशा नांदेड यांचे
टिमने नांदेड शहरातील चोरी करणारे आरोपीचा शोध घेत असतांना त्यांना मिळालेल्या गोपनिय माहीती प्रमाणे एक संशयित विधीसंघर्षग्रस्त बालकाकडे त्याचे पालका समक्ष विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याचे सांगणे की तो त्याच मित्र असे दोघे मिळून नांदेड शहरातील हनुमानगड भागातुन एक मोटार सायकल चोरी करुन त्याच मोटार सायकलवरुन मौजे येळेगाव येथे एका व्यक्तीस खंजरचा धाक दाखवुन त्याचे कडुन रोख रक्कम व मोबाईलची जबरी चोरी केली आहे असे पंच व पालका समक्ष सांगीतले आहे.
यातील विधीसंघर्षग्रस्त बालकाचे पालकाचे ताब्यातुन त्यांनी चोरी केलेली एक मो.सा., रोखरक्कम व गुन्हे करतांना वापरलेला खंजर असा एकुण 61,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन रिपोर्टासह पो.स्टे. विमानतळ येथे देण्यात आले आहे. नमुद विधासंघर्षग्रस्त बालका कडुन खालील गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कार्यवाही ही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, साईनाथ पुयड पोउपनि पोलीस अंमलदार प्रभाकर मलदोडे, गंगाधर कदम, राजु डोंगरे, विश्वनाथ पवार व चालक गंगाधर घुगे व सायबर येथील अंमलदार राजु सिटीकर यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.