नांदेड| नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत वाजेगाव बीटस्तरीय कार्यशाळेचे आयोजन हजरतह फातेमा हायस्कूल बोंढार रोड येथे उपशिक्षणाधिकारी गौसिया वडजकर यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली.
यात परिसरात १५ वर्षापुढील असाक्षरांचे सर्वेक्षण करून स्वयंसेवक नेमणूक करण्यात आली आहेत. या असाक्षराचे वर्ग चालू करावे .साक्षरतेमुळे माणूस सुसंस्कृत होतो. अधुनिक डिजिटल युगात मोबाईल संगणक साक्षरता आवश्यक आहे. तसेच दैनंदिन व्यवहारात आर्थिक व्यवहार संपूर्ण डिजिटल पध्दतीने केले जाते.
हि साक्षरता नवसाक्षराना अवगत झाली पाहिजे. म्हणून भारत सरकारने “नवभारत साक्षरता कार्यक्रम ” राबवत आहे. तरी सर्व मुख्याध्यापक शिक्षक स्वयंसेवक विद्यार्थी, नागरिकांनी असाक्षरांना शिक्षणाच्या प्रवाहात जोडण्यासाठी सहकार्य करावे. असे आव्हान मनपा शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी केले.या बीटस्त कार्यशाळेचे आयोजन केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड यांनी केले.तर हजरत फातेमा हायस्कूल च्या मुख्याध्यापिका अंजुम आरा यांनी सहकार्य केले.