उस्माननगर, माणिक भिसे। लोहा तालुक्यातील मौजे गोळेगाव (प.ऊ.) येथील स्मशानभूमी ते गावालगत असलेल्या माळापर्यंत रस्त्याचे काम प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अर्धवट झाले असून सदर रस्त्यात दगड टाकून ठेवल्याने शेताकडे जाताना अडचणीचे होत आहे . तेव्हा सदर पाणंद रस्ताचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे अशी मागणीचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी नांदेड व विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात आले आहे.


गोळेगाव येथील स्मशानभूमी ते गावालगच्या माळापर्यंतचा पाणंद रस्ता करणेची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र सदर रस्त्याचे काम प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अर्धवट राहिले असून रस्त्यावर केवळ दगड टाकून ठेवल्याने रस्त्या बंद असून शेतकऱ्यांना शेतात ये – जा, तसेच शेणखत व पेरण्या तोंडावर येत असल्यामुळे पेरणीसाठी लागणारे बि – बियाणे , खते व शेती अवजारे ने आण करणेसाठी रस्ता पुर्ण न झाल्याने व लगतच्या शेतातून गेल्यास वाद व भांडणे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


त्यास ग्रामविकास अधिकारी व गटविकास अधिकारी जबाबदार राहातील , तेव्हा संबंधीतास सदर कामे लवकरात लवकर करणेसाठी सुचित करणेची विनंती करण्यात आली आहे. त्यावर १७ शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीसह लेखी निवेदन जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात आले. त्यात सदर पाणंद रस्ताचे काम पुर्ण नाही झाल्यास आपले कार्यालया समोर आम्हाला नाईलाजास्तव उपोषणास बसावे लागेल असा इशारा ही त्यात देण्यात आला आहे .




