Pandan Road ; पावसाळ्यापूर्वी अर्धवट पांदन रस्त्याचे काम पूर्ण करा – जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्याकडे शेतकऱ्यांची निवेदनाव्दारे मागणी
उस्माननगर, माणिक भिसे। लोहा तालुक्यातील मौजे गोळेगाव (प.ऊ.) येथील स्मशानभूमी ते गावालगत असलेल्या माळापर्यंत रस्त्याचे काम प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अर्धवट झाले असून सदर रस्त्यात दगड टाकून ठेवल्याने शेताकडे जाताना अडचणीचे होत आहे . तेव्हा सदर पाणंद रस्ताचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे अशी मागणीचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी नांदेड व विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात आले आहे.
गोळेगाव येथील स्मशानभूमी ते गावालगच्या माळापर्यंतचा पाणंद रस्ता करणेची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र सदर रस्त्याचे काम प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अर्धवट राहिले असून रस्त्यावर केवळ दगड टाकून ठेवल्याने रस्त्या बंद असून शेतकऱ्यांना शेतात ये - जा, तसेच शेणखत व पेरण्या तोंडावर येत असल्यामुळे पेरणीसाठी लागणारे बि - बियाणे , खते व शेती अवजारे ने आण करणेसाठी रस्ता पुर्ण न झाल्याने व लगतच्या शेतातून ...
