नांदेड l सीटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या चौथे राज्य अधिवेशन परळी ( वैजनाथ ) येथील प्रवचन मंडपात ८ व ९ नोव्हेंबर रोजी उत्साहात सपन्न झाले.


परळी शहरात मोठी रॅली काढून जाहीर सभा घेण्यात आली. उपरोक्त अधिवेशनासाठी उदघाटक म्हणून फेडरेशनच्या राष्ट्रीय महासचिव कॉ.मधुमिता बंडोपाध्याय ह्या होत्या. निवडक प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झाले होते.


राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा कणा असलेल्या आशा व गटप्रवर्तक ताई मोठ्या संख्येने परळी शहरात दाखल झाल्या होत्या. सदरील अधिवेशन दोन दिवशीय झाले असून सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्याचे अध्यक्ष कॉ.डॉ.डी.एल.कराड, राज्य महासचिव कॉ.ऍड. एम.एच.शेख याची प्रमुख उपस्थिती आहे.


मंचावर कॉ.आनंदी अवघडे, कॉ. पुष्पा पाटील,कॉ. शुभा शमीम, कॉ. आरमायटी इराणी कॉ. प्राची हतीवलेकर, कॉ.उज्वला पडलवार, कॉ. डॉ.अशोक थोरात, कॉ.प्रभाकर नागरगोजे, कॉ.मंगल ठोंबरे आदींची उपस्थिती आहे. या अधिवेशनात अध्यक्षपदी कॉ. आनंदी अवघडे, राज्य महासचिवपदी कॉ.पुष्पा पाटील तर खजिनदारपदी कॉ.अर्चना घुगरे यांची एकमताने निवड करण्यात आली.

नांदेड येथील कॉ.शिलाताई ठाकूर यांची राज्य उपाध्यक्षपदी तर कॉ. वर्षाताई सांगडे यांची राज्य कमिटी सदस्य पदी निवड करण्यात आली.
सीटू जिल्हा कमिटीच्या वतीने नूतन राज्य कमिटीचे अभिनंदन करण्यात आले. अशी माहिती सीटू कामगार संघटनेचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


