धार्मिकनांदेड

In Vishnpuri bailpola festival celebrated ; विष्णपुरी येथे बैलपोळा सण उत्साहात साजरा.. – NNL

नवीन नांदेड| नांदेड तालुक्यातील विष्णुपूरी येथे ३ सप्टेंबर रोजी बैलपोळा सण हनुमान मंदिराच्या वेशीवर उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मानकरी असलेल्या मुकदम सोनबाजी शेषराव हंबर्डे देशमुख यांच्या बैलांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर अनेक शेतकरी राजाने सजवून आणलेल्या बैलजोडी ढोलताशांच्या गजरात फिरवण्यात आला, यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हा सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती.

बैलपोळा सणाच्या निमित्ताने विष्णुपूरी येथे ३ सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते चार वाजता ढोलताशांच्या गजरात, उत्साहाने शेतकरी राजाने आपल्या सर्जा राजाला सजावट करून या बैलपोळा मिरवणूक मध्ये सहभागी केले होते, एक दोन नव्हे तर दिडशे बैलजोडी सहभागी झाली होती, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मानकरी मुकदम सोनबाजी शेषराव हंबर्डे देशमुख यांच्या मानकरी असलेल्या बैलजोडीने पोळा फिरविण्यास सुरूवात केली,मुख्य पुजारी राजेजी महाराज ठाकूर यांच्या विधीवत पुजना नंतर श्रीफळ फोडून बैलपोळा सणाच्या निमित्ताने सहभागी शेतकरी बैलजोडी प्रदक्षिणा मारल्या नंतर मोठ्या उत्साहात हर हर महादेव घोषणा देऊन सण साजरा करण्यात आला.

यावेळी चिंतामणराव देशमुख,माजी सरपंच प्रतिनिधी संतोष बारसे, ग्रामपंचायत सदस्य राजेश हंबर्डे,सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक माधव महाराज भारती, प्रा.गजानन बालासाहेब हंबर्डे,ऊध्दव हंबर्डे,दीपक गोविंदराव हंबर्डे,माजी पोलीस पाटील संजय हंबर्डे,भास्कर हंबर्डे,दिपक हंबर्डे,यांच्या सह गावातील जेष्ठ नागरिक,युवक,शेतकरी यांच्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या बैलपोळा सणाच्या निमित्ताने गावातील शेतकरी राजाने मोठ्या संख्येने ऊत्साहात सहभाग नोंदविला, पोलीस पाटील प्रविण हंबर्डे यांच्यी यावेळी उपस्थिती होती. बैलपोळा सोहळा उत्साहात साजरा होण्यासाठी गावातील युवकासह ग्रामस्थ व शेतकरी यांनी परिश्रम घेतले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button