Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ashwini Deshmukh MBBS Degree : प्रतिकूल परिस्थितीवर मात; वाळकेवाडीच्या कु. अश्विनी देशमुखे यांची एमबीबीएस पदवी संपादन

February 27, 2026

fear-free and copying-free environment : नांदेड जिल्ह्यात बारावीची परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 27, 2026

Chhatrpati shivaji maharaj jayanti :छत्रपतींना डोक्यावर नव्हे, डोक्यात घ्या – डॉ. गफार कार्लेकर

February 27, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ashwini Deshmukh MBBS Degree : प्रतिकूल परिस्थितीवर मात; वाळकेवाडीच्या कु. अश्विनी देशमुखे यांची एमबीबीएस पदवी संपादन
  • fear-free and copying-free environment : नांदेड जिल्ह्यात बारावीची परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrpati shivaji maharaj jayanti :छत्रपतींना डोक्यावर नव्हे, डोक्यात घ्या – डॉ. गफार कार्लेकर
  • School’s : शाळा ही विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देणारे क्षेत्र व्हावे – मुंडकर
  • पणशीकरांचा जोरकस मालकंस
  • Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव
  • दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत
  • आदित्य मोडक यांचा नेटका मुलतानी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - fear-free and copying-free environment : नांदेड जिल्ह्यात बारावीची परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
करियर नांदेड February 27, 2026

fear-free and copying-free environment : नांदेड जिल्ह्यात बारावीची परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

कठोर नियंत्रण, झूम वेबकास्ट व ड्रोन चित्रीकरणामुळे प्रशासनाचे यश  पुढील सर्व परीक्षांसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणा सक्रिय
NNL TeamBy NNL TeamFebruary 27, 20265
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| दिनांक 10 फेब्रुवारीपासून नांदेड जिल्ह्यातील 112 परीक्षा केंद्रांवर इयत्ता 12 वीची परीक्षा सुरू असून ती भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली.

उद्या 27 फेब्रुवारी रोजी इयत्ता 10 वीचा इंग्रजी विषयाचा पेपर असून पुढील सर्व परीक्षांसाठीही जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणा सक्रिय राहणार आहे. विद्यार्थी, पालक व नागरिकांनी कॉपीमुक्त वातावरणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

शासन निर्णय दि. 24 नोव्हेंबर 2025 नुसार जिल्हा दक्षता समितीची बैठक 2 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, डायटचे प्राचार्य तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक व योजना) उपस्थित होते. परीक्षा केंद्रांवर कोणताही बाह्य हस्तक्षेप होऊ नये, नातेवाईक वा इतर व्यक्तींनी केंद्र परिसरात गर्दी करू नये तसेच विद्यार्थ्यांना आत्मविश्वासपूर्ण वातावरण मिळावे, अशा सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवत कोणत्याही केंद्रावर बाहेरील व्यक्तींचा उपद्रव होऊ दिलेला नाही.

प्रशासनाच्या विशेष उपाययोजना : संवेदनशील केंद्रांवरील केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांची अदलाबदल. 58 केंद्रांवर जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची पूर्णवेळ नियुक्ती; उत्तरपत्रिका डिस्पॅच होईपर्यंत उपस्थिती. महत्त्वाच्या विषयांसाठी 58 जिल्हास्तरीय व सुमारे 80 तालुकास्तरीय भरारी पथके कार्यरत. सर्व 112 केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट प्रक्षेपण; मॉनिटरिंगसाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेत स्वतंत्र कक्ष स्थापन. वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्हीद्वारे देखरेख. अतिसंवेदनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे व्हिडिओ चित्रीकरण. कर्तव्यात कसूर करणाऱ्या 12 केंद्रसंचालक/पर्यवेक्षकांविरुद्ध निलंबनाची कारवाई; उमरी येथील बैठे पथकातील सदस्यांवरही कारवाई.

गैरप्रकारांवर कठोर कारवाई – इंग्रजी विषयात 1, भौतिकशास्त्रात 7, रसायनशास्त्रात 3, गणित व संख्याशास्त्रात 5, जीवशास्त्रात 2 आणि हिंदीत 1 असे एकूण 19 कॉपी प्रकरणे नोंदविण्यात आली असून त्याबाबतचा अहवाल मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थ्यांवर मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

किनवट तालुक्यातील सौ. संगितादेवी उच्च माध्यमिक आश्रमशाळा, दहेली तांडा येथे बाहेरील अज्ञात व्यक्तीविरुद्ध जीवशास्त्र परीक्षेच्या दिवशी गुन्हा नोंदविण्यात आला असून परीक्षेच्या कामात कुचराई करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. बारावीच्या 42 हजार 803 विद्यार्थ्यांसाठी 112 केंद्रसंचालक व सुमारे 1,716 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहायक परीरक्षकांनी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सुरक्षितरीत्या वाहतूक करण्याचे काम काटेकोरपणे पार पाडले आहे.

एकूणच, बैठे पथक, भरारी पथक, झूम वेबकास्ट, ड्रोन चित्रीकरण व कडक पोलीस बंदोबस्त यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परीक्षा पारदर्शक, शिस्तबद्ध आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच इयत्ता 10 वी व 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उर्वरित पेपर आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे व भयमुक्त तसेच कॉपीमुक्त वातावरणात सोडवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Class 12th examination in Nanded district District Collector Rahul Kardile in a fear-free and copying-free environment
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleChhatrpati shivaji maharaj jayanti :छत्रपतींना डोक्यावर नव्हे, डोक्यात घ्या – डॉ. गफार कार्लेकर
Next Article Ashwini Deshmukh MBBS Degree : प्रतिकूल परिस्थितीवर मात; वाळकेवाडीच्या कु. अश्विनी देशमुखे यांची एमबीबीएस पदवी संपादन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ashwini Deshmukh MBBS Degree : प्रतिकूल परिस्थितीवर मात; वाळकेवाडीच्या कु. अश्विनी देशमुखे यांची एमबीबीएस पदवी संपादन

Chhatrpati shivaji maharaj jayanti :छत्रपतींना डोक्यावर नव्हे, डोक्यात घ्या – डॉ. गफार कार्लेकर

School’s : शाळा ही विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देणारे क्षेत्र व्हावे – मुंडकर

पणशीकरांचा जोरकस मालकंस

Bullocks pairs : श्री परमेश्वर यात्रेत पशुप्रदर्शन स्पर्धा उत्साहात; उत्कृष्ट बैलजोडी, गाय-कालवडींच्या मालकांचा गौरव

दिवाना किये श्याम,क्या जादू डाला..! स्वरांच्या जादुगीरीने रसिक अभिमंत्रीत

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

अय्यप्पा स्वामी मंदिरातील एक लाख 33 हजार रुपयांचा ऐवज लंपास -NNL

June 18, 2024

NCP’s Sharad Chandra Pawar ; अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मागणी – NNL

September 3, 2024

Mp ashok chavhan ; संसदेच्या लोकलेखा समितीवर खा. अशोक चव्हाण -NNL

August 19, 2024

मध्य रेल्वेकडून प्रायोगिक तत्वावर चालवण्यात येणारी गाडी क्र.०११३९/४० नागपूर ते मडगांव गोवा एक्स्प्रेस कायमस्वरुपी सुरु करा – NNL

June 15, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Sports day celebration : खो खो असोशिएशन यांच्या वतीने क्रिडा दिन साजरा -NNL

Shrivaraha Swamy Jayanti : पंचमुखी हनुमान मंदिर श्रीबागेश्वर धाम कार्यालयात श्रीवराह स्वामी जयंती उत्साहात साजरी

Class 10th-12th exams in February-March : दहावी-बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्च मध्ये

Lakdoba Chowk Cucumber Aarti : हिमायतनगरच्या लकडोबा चौकात काकडा आरतीला सुरुवात; महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

Vasantrao Naik : स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त ईस्लापूर येथे अभिवादन व वृक्षारोपण

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ashwini Deshmukh MBBS Degree : प्रतिकूल परिस्थितीवर मात; वाळकेवाडीच्या कु. अश्विनी देशमुखे यांची एमबीबीएस पदवी संपादन

February 27, 2026

fear-free and copying-free environment : नांदेड जिल्ह्यात बारावीची परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 27, 2026

Chhatrpati shivaji maharaj jayanti :छत्रपतींना डोक्यावर नव्हे, डोक्यात घ्या – डॉ. गफार कार्लेकर

February 27, 2026

School’s : शाळा ही विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देणारे क्षेत्र व्हावे – मुंडकर

February 27, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?