नांदेड l जिल्ह्यात व शहरात गेल्या आठवड्यात १८७ मिली मीटर पेक्षा अधिक पाऊस पडून अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शहरातील सखल भागात, नदी काठावर व नाल्याच्या काठावर राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरून कपडा लता, अन्न धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.


शासनाच्या आदेशानुसार तात्काळ सर्वेक्षण व पंचनामे करण्याचे काम सुरु करण्यात आले परंतु मागच्या वर्षीप्रमाणेच सरसगट पंचनामे न करता मोचक्या व प्रतिष्ठित लोकांच्या सूचनेनुसार यादीत नावे टाकण्यात येत आहेत.या विरोधात ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते ५ यावेळेत तहसील कार्यालय नांदेड येथे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न मजदूर युनियनच्या वतीने तीव्र आंदोलन करीत पाच तास धरणे आंदोलन करण्यात आले.भीम आर्मी आजाद समाज पार्टीच्या वतीने मागील वर्षीचे मंजूर अनुदान वाटप करावे या मागणी साठी वर्षपूर्ती म्हणून केक कापून आंदोलन करण्यात आले व नंतर सीटू व भीम आर्मी चे कार्यकर्ते एकत्र येत संयुक्त घोषणाबाजी करत व जाहीर सभा घेण्यात आली.

यावर्षी भाडेकरूना सानुग्रह अनुदानापासून नाकरण्यात येत आहे. ही बाब अन्यायकारक आहे.मागील वर्षी प्रमाणे शासन मान्य मजदूर युनियनचे अर्ज स्वीकारण्यास विलंब केला जात आहे. तातडीने अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात यावी.वसुली लिपिक व तलाठी हे नगरसेवक किंवा प्रतिष्ठित व्यक्तीच्या दबावाखाली येऊन मोचक्या लोकांची नावे पूरग्रस्त म्हणून पात्र ठरवीत आहेत.हा प्रकार गंभीर असून त्यात सुधारणा करून सरसगट पूरग्रस्तांना अनुदान मंजूर करावे या मागणी साठी जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी संघटनेच्या पुढाऱ्यांची भाषणे झाली.


या आंदोलनाचे नेतृत्व सीटू च्या वतीने जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार, राज्य कमिटी सभासद कॉ.करवंदा गायकवाड,जमसं च्या जिल्हाध्यक्षा कॉ.लता गायकवाड, डीवायएफआयचे तालुका अध्यक्ष कॉ.जयराज गायकवाड, उपाध्यक्ष कॉ. सुभाषचंद्र गजभारे, कॉ.मंगेश वट्टेवाड, कॉ.राहुल नरवाडे, कॉ. अजिजूर रहेमान यांनी केले तर भीम आर्मी आजाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण सदावर्ते , उत्तर जिल्हा प्रभारी आशिष भारदे,जिल्हा महासचिव भीमराव हैबते,बुद्धभूषण जोंधळे विशाल हैबते, संदेश इंगोले,अनिकेत बेरर्जे, गंगाधर गंगासागरे,अब्दुल मतीन, सय्यद अंनजार, बबलु शेख, गोदमगावकर सलाम शेख आदींनी नेतृत्व केले ष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापूरकर यांनी मनोगत व्यक्त करून पाठिंबा दिला.

अपरोक्त आंदोलनामध्ये मोठ्या सख्येने पूरग्रस्त सामील झाले होते. सीटूच्या वतीने ७६० पूरग्रस्तांची यादी तहसीलदार उपविभागीय अधिकारी नांदेड व मनपा आयुक्त यांना सादर करण्यात आली असून जायमोक्यावर जाऊन प्रत्यक्षात पाहणी करून पंचनामे करावेत व अनुदान पात्र यादीत नावे समाविष्ट करण्याची मागणी लेखी स्वरूपात करण्यात आली असून राहिलेल्या पूरग्रस्तांची यादी लवकरच सादर करण्यात येणार आहे. सदरील पूरग्रस्तांच्या घराची गृहपाहणी केली नाहीतर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी स्पष्ट केले. तहसीलदार नांदेड यांनी लेखी पत्र काढले असून आयुक्त मनपा यांना योग्य कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. तहसीलदार यांनी सोबत संघटनेचे निवेदन पाठविले आले आहेत.
कॉ.गंगाधर गायकवाड,
जनरल सेक्रेटरी CITU नांदेड जिल्हा कमिटी.
मो. 7709217188

