शिवणी, भोजराज देशमुख। शिवणी -किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेलगत असलेल्या शेवटच्या टोकावरील मौजे अप्पारावपेठ येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गावालगत असलेल्या प्रार्थमिक आरोग्य केंद्राजवळील रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून नवीन पूल उभारणी चालू आहे.परंतु या पुलाच्या कामाची सुरुवात झाल्यापासून या पुलाच्या बाजूने पर्यायी वळण रस्ता संबधित गुत्तेदाराकडून काढण्यात आले नाही.करिता स्थानिक नागरिकांच्या रहदारीच्या समस्या लक्षात घेऊन येथील सरपंच अब्दुल रब शेख फरीद यांनी संबधित विभागासह जिल्हा प्रशासनाकडे संबधित गुत्तेदारास या संबंधी देयके देऊ नये असे म्हणत काल दि.२ आगस्ट रोजी लेखी तक्रार केली आहे.


अप्पारावपेठ गावाजवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचे काम चालू असुन बाजुने पर्यायी रस्ता नसल्याने गागावातील महिला , पुरुषांना दवाखान्यात जाण्यासाठी पावसाळ्यात रस्ता नाही , डीलेवरि , ऑक्सीजन, पॉयझन रूग्ण दवाखान्यात घेऊन जाणे. अतिशय अवघड होऊन बसले आहे यासाठी गावचे सरपंच अब्दुल रब शेख फरिद यांनी लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे तरी याकडे कुणीही लक्ष केंद्रित करून प्रर्यायी रस्ता करून गैरसोय दुर करण्यासाठी समोर येईन.यातीलच मौजे अप्पारावपेठ येथे मागील चार महिन्यापासून अप्पारावपेठ ते शिवणी या मार्गावर गावालगत माध्यमिक शाळा व प्रार्थमिक आरोग्य केंद्राशी लागून नवीन पुलाचे काम चालू आहे.


सदरील पुलाच्या कामाची सुरुवात झाली तेव्हापासून या पुलाच्या बाजूने गुत्तेदाराकडून पर्यायी वळण रस्ता काढणे महत्त्वाचे होते परंतु संबंधित गुत्तेदारांनी पर्यायी वळण रस्ता न काढताच नवीन पुलाचे काम चालू केले. मागील दोन महिने उन्हाळ्यात याचा त्रास झाला नाही परंतु पावसाळा सुरू झाल्यापासून या रस्त्यावरील गावात जाण्यासाठी रहदारी बंद झाली आहे. याचे कारण तात्पुरत्या स्वरूपाचे दोन नळकांडे टाकून आजूबाजूला भरलेल्या मुरूम पहिल्याच पुरात वाहून गेले यानंतर मात्र गुत्तेदाराकडून या पर्यायी पुलाची व्यवस्था करणे गरजेचे होते.परंतु संबंधित गुत्तेदाराने असे केले नाही करिता यामुळे आप्पारापेठ येथे येणाऱ्या भोकर आगाराची नांदेड अप्पारोपेठ महामंडळ बस ही पर्याय रस्ता नसल्यामुळे अप्पारावपेठ ऐवजी शिवणी येथे मुक्काम ठोकत आहे.



यामुळे थेट अप्पारावपेठ ते नांदेड व नांदेड ते अप्पारावपेठ प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना याचा मोठा फटका बसला आहे. यासोबतच तेलंगणातील म्हैसा आगाराची बस व किनवटच्या आगाराची महामंडळ बस ही गावच्या वेशीवरूनच पलटून जाऊ लागली आहे.यामुळे येथील नागरिकांना शिवणी इस्लापूर किनवट नांदेड हिमायतनगर व म्हैसा या शहरी जाण्यासाठी गावातून एक किलोमीटर पायदळ करावे लागत आहे.तर दुसरीकडे हा पर्याय रस्ता नसल्याने येथील रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रास घेऊन जाण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तर दुचाकी स्वारास आपले जीव मुठीत घालून या नवीन पुलाच्या कडाने दुचाकी काढावी लागत आहे तर दररोज ये जा करणाऱ्या माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागली आहे.या संदर्भात संबधित गुत्तेदारास अनेक वेळा तोंडी सांगून सुद्धा गुत्तेदाराने अखेरपर्यंत पर्यायी वळण रस्ता बनवलाच नाही.या सर्व बाबीची दखल घेत अप्पारावपेठ येथील सरपंच अब्दुल रब शेख फरीद यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा प्रशासनाकडे लेखी तक्रार दिलेली आहे.या तक्रारीत संबंधित गुत्तेदाराकडून चालू असलेल्या या नवीन पुलाच्या संदर्भात अंदाज पत्रकातील रक्कम मधील पर्यायी पुलासाठी निवडलेली रक्कम व देयके संबंधित गुत्तेदाराला देण्यात येऊ नये असे तक्रार केली आहे.

या संदर्भात सरपंच म्हणाले की, आप्पाराव पेठ येथील नाल्यावर पुलाचे काम चालू असून पुलाच्या बाजूला वळण रस्ता बनवल्या नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र व शाळेला जाण्यासाठी व गावात येण्यासाठी बस ला रस्ता नसल्याने गावातील इतर गावाशी संपर्क तुटला आहे यासंदर्भात संबंधित विभागाला सरपंच अब्दुल रब शेख फरीद यांनी एका तक्रारीद्वारे संबंधित पुलाच्या बाजूस वळण रस्ता बनवल्याशिवाय वळण रस्त्याची रक्कम काढूण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे.


