Wednesday, May 13

Tag: Sarpanch Abdul Rab complained

Apparaopeth Bridge construction : नवीन पुलाच्या बाजूने पर्यायी रस्ताअभावी अप्पारावपेठचे नागरिक आरोग्य सेवा व बस सेवेपासुन वंचीत – सरपंच अब्दुल रब यांनी केली तक्रार -NNL

Apparaopeth Bridge construction : नवीन पुलाच्या बाजूने पर्यायी रस्ताअभावी अप्पारावपेठचे नागरिक आरोग्य सेवा व बस सेवेपासुन वंचीत – सरपंच अब्दुल रब यांनी केली तक्रार -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
शिवणी, भोजराज देशमुख। शिवणी -किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेलगत असलेल्या शेवटच्या टोकावरील मौजे अप्पारावपेठ येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गावालगत असलेल्या प्रार्थमिक आरोग्य केंद्राजवळील रस्त्यावर मागील काही महिन्यांपासून नवीन पूल उभारणी चालू आहे.परंतु या पुलाच्या कामाची सुरुवात झाल्यापासून या पुलाच्या बाजूने पर्यायी वळण रस्ता संबधित गुत्तेदाराकडून काढण्यात आले नाही.करिता स्थानिक नागरिकांच्या रहदारीच्या समस्या लक्षात घेऊन येथील सरपंच अब्दुल रब शेख फरीद यांनी संबधित विभागासह जिल्हा प्रशासनाकडे संबधित गुत्तेदारास या संबंधी देयके देऊ नये असे म्हणत काल दि.२ आगस्ट रोजी लेखी तक्रार केली आहे. अप्पारावपेठ गावाजवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणाऱ्या रस्त्यावर पुलाचे काम चालू असुन बाजुने पर्यायी रस्ता नसल्याने गागावातील महिला , पुरुषांना दवाखान्यात जाण्यासाठी पावसाळ्यात रस्ता नाही , डीलेवरि , ऑक्...
error: Content is protected !!