नांदेड| अण्णाभाऊ साठे चौक ते नाईक चौक या भागातील नागरिकांनी ह्या मार्गांवरील अनाधिकृत हातगाडे हटवावीत अश्या मागणीचे निवेदन दि.22 जुलै रोजी जिल्हाधिकारी नांदेड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यामार्फत आयुक्तांना पाठविले आहे.
देण्यात आलेल्या निवेदनात नागरिकांचे म्हणणे आहे कि, आमची परवानगी न घेता काही व्यक्तींनी जबरदस्ती हातगाडे लावलेले आहेत. ह्या हातगाड्यामुळे सदरील रोडवर नेहमी ट्रैफिकजाम राहते एम्बुलन्स येण्या-जाण्यासाठी सुध्दा अवघड झाले आहे. आम्हाला घरातून बाहेर पडण्यासाठी सुध्दा अवघड होत आहे. हे हातगाडेवाले ग्राहकासोबत दादागीरी करुन नेहमी भांडण सुध्दा करीत आहेत.
सदरील हातगाडेवाले कचरा बाजुच्या नालीमध्ये टाकत आहेत व उरलेला कचरा रोडवर टाकत आहेत. त्यामुळे नालीचे पाणी तुंबत आहे व घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. तसेच सदरील हातगाडेवाले माईकव्दारे ओरडून ध्वनीप्रदुषण करत आहेत. करीता ताबडतोब साठेचौक ते नाईक चौक मेन रस्त्यावरील सर्व हाथगाडे हटवावीत. असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे.