नांदेड। नांदेड शहरातील शिवनगर येथील DP नंबर 202 राशन दुकान जवळील मागील अनेक महिन्यापासून सतत ना दुरुस्त होत असून सतत लाईट जात असते कधी फ्यूज जातात तर कधी किटकॅट क्लिप तुटतात.रात्री अनेकवेळा परिसरातील नागरिकांना अंधारात रहावे लागते.विद्युत विभाग झोपा काढतो की काय असा सूर नागरिकांतून येत आहे.महावितरणचा कारभार सध्या राम भरोसे सुरू आहे.


फ्युजचे तार संपले,क्लिप नाहीत असे कारणे देत तात्पुरता जुगाडूपणा करून लाईनमेन निघून जातात. अनेकवेळा उप अभियंता उमरीकर यांना तक्रार करून देखील सदर DP चे काम होत नाही. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महावितरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचे सोबत बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या शहरातील सर्व रोहित्र दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत ठेवा नागरिकांना नाहक त्रास होईल असे काम करू नका परंतु उमरीकर यांच्या सारख्या अधिकाऱ्याच्या हलगर्जी कामामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्या सारखे आहे.



नांदेड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. विशेषतः संध्याकाळी व रात्रीच्या वेळेस वारंवार लाईट जाण्याचे प्रकार इतके वाढले आहेत की नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा थेट परिणाम होत आहे. दरवेळी “वादळ”, “वारं”, “निसर्गामुळे खंडित पुरवठा” असे एकच कारण पुढे करून महावितरण जबाबदारी झटकत आहे, हे अत्यंत खेदजनक आहे. ही वारंवारता फक्त निसर्गामुळे नसून व्यवस्थापनातील दुर्लक्ष व तांत्रिक दुर्बलतेचा परिणाम आहे.


सदर परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होत आहे. सध्या विध्यार्थी विविध परीक्षेची तयारी करत आहे, जी अत्यंत स्पर्धात्मक व महत्वाची परीक्षा असतात . मात्र, सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे अभ्यासासाठी लागणारा वेळ, एकाग्रता आणि मानसिक स्थैर्य यावर विपरीत परिणाम होत आहे. ऑनलाइन कोचिंग, चाचणी परीक्षा, डिजिटल स्टडी मटेरियल्स यासाठी अखंड वीज अत्यावश्यक आहे, आणि तीच मिळत नसल्याने अभ्यासाचा स्तर खालावत आहे.

याशिवाय सतत वीज खंडित झाल्यामुळे घरातील विद्युत उपकरणांनाही हानी होत आहे. वीज पुरवठा वारंवार कमी-जास्त होण्याने फ्रीज, संगणक, वाय-फाय राउटर यासारखी उपकरणे वारंवार बंद पडत आहेत.
प्रभाग क्र. 10 मधील वीज खंडिततेचा सखोल आढावा घेणे गरजेचे आहे,समस्येच्या मुळाशी जाऊन तात्काळ सुधारणा कराव्यात क्षमतेनुसार ट्रान्सफॉर्मर व डी.पी. बदलून वीज वितरण यंत्रणा मजबूत करावी. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणारा परिणाम लक्षात घेऊन, वीज पुरवठा किमान परीक्षा कालावधीत तरी अखंड ठेवण्याची विशेष व्यवस्था करावी.अशी मागणी शिवनगर परिसरातील नागरिकांनी केली आहे.


