Mahavitaran ; शिवनगरातील DP नादुरुस्तीमुळे नागरिक हैराण; महावितरण अधिकाऱ्याकडून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली
नांदेड। नांदेड शहरातील शिवनगर येथील DP नंबर 202 राशन दुकान जवळील मागील अनेक महिन्यापासून सतत ना दुरुस्त होत असून सतत लाईट जात असते कधी फ्यूज जातात तर कधी किटकॅट क्लिप तुटतात.रात्री अनेकवेळा परिसरातील नागरिकांना अंधारात रहावे लागते.विद्युत विभाग झोपा काढतो की काय असा सूर नागरिकांतून येत आहे.महावितरणचा कारभार सध्या राम भरोसे सुरू आहे.
फ्युजचे तार संपले,क्लिप नाहीत असे कारणे देत तात्पुरता जुगाडूपणा करून लाईनमेन निघून जातात. अनेकवेळा उप अभियंता उमरीकर यांना तक्रार करून देखील सदर DP चे काम होत नाही. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी महावितरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचे सोबत बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या शहरातील सर्व रोहित्र दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत ठेवा नागरिकांना नाहक त्रास होईल असे काम करू नका परंतु उमरीकर यांच्या सारख्या अधिकाऱ्याच्या हलगर्जी कामामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला के...
