नवीन नांदेड l सिडको शिवसेनेच्या बालेकिल्ला पुन्हा अबाधित राहील यासाठी शिवसैनिकांना आगामी मनपाच्या निवडणूक निमित्ताने शिवसैनिक व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून दोन्ही प्रभागातील एक समिती करून नऊही जागा निवडणूक निमित्ताने लढविण्याची तयारी ठेवावी युती असो किंवा नसो तयारी लागा असे आवाहन शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी सिडको येथे आयोजित बैठकीत केले.


आगामी नांदेड मनपा निवडणूक निमित्ताने सिडको येथील धुत बँकेट हॉल येथे 28 जुलै रोजी आयोजित पदाधिकारी व शिवसैनिक यांच्यी बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी आमदार आनंदराव पाटील बोढारकर, दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे,माजी नगरसेवक,बाळासाहेब देशमुख, राजेंद्र कुलथे,सिडको शहरप्रमुख सुहास पाटील खराणे,ओबीसी जिल्हा प्रमुख अनिल पाटील धमणे,महिला आघाडीच्या स्मिता कुलकर्णी ,गजानन राजरवार,यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख आगामी निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे सांगितले तर,आ.आनंदराव बोढारकर यांनी निवडणूक लढविण्यासाठी सज्ज राहून पदाधिकारी यांनी वार्ड निहाय बैठका घेऊन नागरीकांचे प्रश्न सोडविण्या साठी प्रयत्न करावे असे सांगितले.


यावेळी आ.हेमंत पाटील यांनी आगामी निवडणुकीसाठी युती झाली तर चांगलेच आहे तर स्वबळाची भाषा होत असल्यास शिवसेना स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे सांगून, इच्छुकांनी जिल्हा प्रमुख यांच्याशी संपर्क ठेवावा असे सांगितले.

बैठकीचे सुत्रसंचलन मारोती धुमाळ यांनी केले या बैठकीस माजी सरपंच सुदीन बागल,भालचंद्र मोळके, पिंटू महाराज,संजय लहानकर,सतिश खैरे,पप्पू गायकवाड,राजु टमना, शिवाजी धुमाळ, भालचंद्र नाईक, रामेश्वर काळे, कृष्णा पांचाळ,संतोष खैरे, संजय जोंधळे,पंडित गजभारे, आनंद सरोदे, अंकुश शिखरे,रवि थोरात ,विजय पांचाळ यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.


