Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश
  • Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता
  • Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
  • hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे
  • school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना
  • Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान
  • misuse of domestic gas : घरगुती गॅसचा गैरवापर निदर्शनास आल्यास तक्रार द्यावी
  • Selling fertilizer : चढ्या दराने खत विक्री; देगलूरमधील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरतेय रुग्णांसाठी नवसंजीवनी !
नांदेड लेख July 21, 2025

Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरतेय रुग्णांसाठी नवसंजीवनी !

NNL TeamBy NNL TeamJuly 21, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यातील गरजू व पात्र नागरिकांना दुर्धर आजारांवरील उपचारासाठी मदत मिळावी यासाठी जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाकडून रुग्णांना आर्थिक सहाय्य तसेच आपत्ती प्रसंगी आर्थिक मदत देण्यात येते. पुर्वी राज्यातील कानाकोपऱ्यातून मदत मिळविण्यासाठी नागरिक मंत्रालयात जात होते. नागरिकांना या सेवा सहजपणे त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, रुग्णांना वैद्यकीय उपचाराकरीता अर्थसहाय्य सहज उपलब्ध व्हावे, मुख्यमंत्री सहायता निधीच्या प्रकरणाची माहिती नागरिकांना आपल्या जिल्ह्यातच व्हावी यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाची सुरवात करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पात्र व गरजु रुग्णांसाठी वरदान ठरत असून 1 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधीत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून नांदेड जिल्ह्यात 385 रुग्णांना 3 कोटी 31 लाखांची मदत देण्यात आली आहे. दिवसेंदिवस या मदतीमध्ये वाढ होत आहे. गरजू रुग्णांना वेळेत मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्यावतीने तत्परतेने दक्षता घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून जिल्हा स्तरावर कक्ष उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रशिक्षण भवनच्या इमारतीत या कक्षाची स्थापना करण्यात आली असून नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या कक्षाचे 1 मे रोजी उद्घाटन झाले. या कक्षाच्या कार्यवाहीसाठी नोडल अधिकारी म्हणून रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणजे काय ?
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत राज्यातील गरजू व पात्र नागरिकांना उपचारासाठी आर्थिक मदत करणे. ही योजना महाराष्ट्र राज्य शासनामार्फत राबविली जाते. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्टया दुर्बल आणि गरजु रुग्णांना त्यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. ही मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून दिली जाते.
या योजनेसाठी पात्रता निकष कोणते आहेत ?
अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. कुटुंबाचे चालू वर्षाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार रुपये पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तहसीलदार यांचे चालू वर्षाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र आवश्यक आहे.

या योजनेअंतर्गत कोणकोणत्या आजारावर मदत मिळते ?
कॉक्लियर इम्प्लांट, हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, मूत्रपिंड प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, अस्ती मज्जा प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, खुब्याचे प्रत्यारोपण, कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोग औषधोपचार किरणोपचार, अस्थिबंधन, नवजात शिशूंचे संबंधित आजार, गुडघ्याचे प्रत्यारोपण, रस्ते अपघात, लहान बालकांच्या संबंधित शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार, हदयरोग, डायलिसिस, जळीत रुग्ण, विद्युत अपघात, विद्युत जळीत रुग्ण या आजारावर मदत मिळते.

अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात ?
विहित नमुन्यातील अर्ज, रुग्ण दाखल असल्यास त्याचा जिओ टॅग फोटो, वैद्यकीय उपचार चालू असलेल्या रुग्णालयाचे खर्चाचे अंदाजपत्रक, तहसीलदार यांचा चालू आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रुग्णाचे आधार कार्ड, लहान बालकांच्या बाबतीत बालकाच्या मातेचे आधार कार्ड, रुग्णाचे रेशन कार्ड, संबंधित व्याधी विचार आजाराचे संबंधी निदानात्मक तथा उपचारात्मक बाबींची कागदपत्रे, अपघातग्रस्त रुग्णांच्या बाबतीत एफआयआर रिपोर्ट, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अपेक्षित असलेल्या रुग्णासाठी विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती झेडटीसीसी (ZTCC) यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अर्ज कसा करावा ?
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयातून अर्ज मिळवता येतो. आवश्यक कागदपत्रांसह संपूर्ण तपशील भरावा. अर्ज मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा मंत्रालय मुंबई येथे ईमेलद्वारे aao.cmrf-mh@gov.in सादर करावा. त्यानंतर प्राप्त झाल्यावर कागदपत्रांची व पात्रतेची पडताळणी केली जाते. मंजुरीनंतर मदतीची रक्कम थेट रुग्णालयाच्या खात्यात जमा केली जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयाची कोणती अट असते ?
मान्यता प्राप्त रुग्णालय: रुग्णालय शासन मान्यताप्राप्त असावे. ज्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत ते सरकारी (Public) किंवा मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी सलंग्नित/करारबद्ध खासगी रुग्णालय (Empanelled Private Hospital) असावे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये समाविष्ट खासगी रुग्णालयांची यादी वेळोवेळी मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष मंत्रालय मुंबई कडून https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाते. त्या यादीतील रुग्णालयात उपचार चालू असणे आवश्यक आहे. निधीसाठी अर्ज करताना रुग्णालयाने दिलेले खर्च पत्रक (Estimate) आणि उपचारासाठीची शिफारस आवश्यक असते.

किती रक्कम पर्यंत मदत मिळू शकते ?
मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करतांना रुग्णाचा आजार व उपचाराचे स्वरूप यावरून रुपये 2 लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते.
रुग्णांना किती रक्कम मदत म्हणून वितरीत करण्यात आली ?
1 जानेवारी ते 30 जून 2025 या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील 385 रुग्णांना 3 कोटी 31 लाख 99 हजार 500 रुपये एवढी रक्कम मदत म्हणून वितरीत करण्यात आली.

मदत मिळालेल्या काही ठळक आणि सकारात्मक उदाहरणांची माहिती
नायगाव तालुक्यातील ताकाबिड येथील 24 वर्षाच्या शिवशक्ती पंढरी इंगळे यांना डोक्याला मार लागल्यामुळे व पाठीच्या कण्याचे दुखापत झाल्यामुळे या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून 1 लाख रुपयांची मदत मिळाली. ही महिला माहेरी जात असताना रस्ता अपघात घडला व बऱ्याच गंभीर दुखापती झाल्यामुळे तिला नांदेड येथील निर्मल न्युरोकेअर रुग्णालय येथे तातडीने उपचार झाल्यामुळे तिचा जीव वाचला व ती आता सुखरूप आहे.

उमरी तालुक्यातील सुदाम परसराम अक्कलवाड वय वर्ष 18 यांना अपघातामुळे डोक्याला दुखापत झाली होती. हा तरुण घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये काम करीत होता. कामावर जात असताना रस्ते अपघातात त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापती झाल्या. नांदेड येथील यशोसाई क्रिटीकल केअर रुग्णालय येथे त्याचावर पूर्ण उपचार होऊन तो आता सुखरूप आहे. त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून 1 लाख रुपये मदत मिळाली, अशा अनेक रुग्णांना मदत मिळाली या निधीतून मदतीचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एफसीआरए मान्यता मिळाल्याचा अर्थ आणि त्याचा लाभ काय आहे? FCRA म्हणजे Foreign Contribution Regulation Act (परकीय योगदान नियमन अधिनियम). भारत सरकारने हा कायदा परकीय निधीचा उपयोग पारदर्शक आणि कायदेशीर राहावा यासाठी लागू केला आहे. कोणत्याही सरकारी / खाजगी संस्थेला FCRA मंजुरी मिळाल्या शिवाय परदेशातून निधी स्वीकारता येत नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्यला एफसीआरएची मान्यता मिळालेली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एफसीआरए मिळाल्याचे फायदे
आता परदेशातून मदत स्वीकारता येणार आहे. भारताबाहेर राहणारे भारतीय, विदेशी व्यक्ती, संस्था मुख्यमंत्री निधीस थेट आर्थिक मदत करू शकतात. केवळ देशातीलच नाही तर परदेशातील देणगी दारांकडूनही निधी जमा होईल. यामुळे मोठ्या प्रमाणावर मदतकार्य शक्य होईल. नैसर्गिक आपत्ती, आरोग्य सेवा, गरीबांना वैद्यकीय मदत करण्यासाठी अधिक निधी वापरता येईल. यामुळे गुंतवणूक, विश्वास वाढेल व जागतिक स्तरावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीची विश्वासार्हता वाढेल.

लेखक….अलका पाटील, उपसंपादक, जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड.

Chief Minister's Relief Fund is becoming a lifeline for patients!
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlediagnostic camp : शेवडी (बा) येथे; रोगनिदान शिबिरात २२५ रूग्ण व ७५ बालकांची आरोग्य तपासणी व उपचार
Next Article Women from Kolha : कोल्हा येथील महिलांनी घेतली सीटूच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची भेट
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना

Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Revenue Department : जिल्हाधिकारी यांच्या पत्राची महसूल विभागाने सांधी चौकशी केली नाही – शरद राठोड

March 22, 2025

Nanded crime News; नांदेड ग्रामीण पोलीसांनी घोरपड तस्करास पकडून दोन घोरपडीस दिले जीवदान

June 10, 2025

The wounds of the flood and the tears of the river! महापूराच्या जखमा अन् नदीचे अश्रू!

September 30, 2025

District Collector : विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी

May 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

freedom struggle ; भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रीयांचे योगदान – NNL

Guru Ravidas Maharaj : सिरंजणी येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

Nanded ; विकसित नांदेडसाठी महापालिकेत भाजपाची बहुमताने सत्ता आणा -खा. चव्हाण

Farmers worry : मुळी कुज रोगाचा कहर; मांजरम–नायगावात तूर उत्पादक शेतकरी संकटात

loan waiver : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात अभ्यास समिती गठीत

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?