Thursday, May 14

मनोरंजन

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Ashadhi Ekadashi । नांदेडमध्ये 17 जुलै रोजी “गजर हरिनामाचा” पांडुरंगाच्या भक्ती गीतांचा अविट नजराना -NNL

Ashadhi Ekadashi । नांदेडमध्ये 17 जुलै रोजी “गजर हरिनामाचा” पांडुरंगाच्या भक्ती गीतांचा अविट नजराना -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर दिनांक 17 जुलै 2024 रोजी सायंकाळी ७ वाजता येथील कुसुम सभागृहात कलांगण प्रतिष्ठान आणि दैनिक प्रजावाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्य गजर हरिनामाचा हा विठ्ठल गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे . या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक त्यागराज खाडिलकर मुंबई आणि सुर नवा ध्यास नवा 2022 ची उपविजेती ,संज्योती जगदाळे हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना निर्मिती आणि निवेदन ॲड गजानन पिंपरखेडे यांचे असून त्यांना निवेदनाची साथ देत आहेत डॉ. वैशाली गोस्वामी. तर निर्मिती सहाय्य रमेश मेगदे यांनी केले आहे . Gorasena| …..तर बंजारा समाजाच्या भरवशावर निवडूण जाणार्‍या ६२ आमदारांना घरचा रास्ता दाखवणार -गोरसेना – NNL या कार्यक्रमात आषाढीच्या पावन पर्वावर रसिकांना विठ्ठल गीतांच्या वर्षावात व हरिनामाच्या गजरात चिंब भ...
गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार शिफारस पात्र कलाकारांना माहिती पाठविण्याचे आवाहन – NNL

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार शिफारस पात्र कलाकारांना माहिती पाठविण्याचे आवाहन – NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा गायन/संगीत क्षेत्रामध्ये उत्तम व प्रदीर्घ कार्य करणाऱ्या कलाकारास दरवर्षी प्रदान करण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप रुपये 10 लाख रुपये, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सन 2023 व सन 2024 या वर्षीच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार निवड समितीची बैठक लवकरच आयोजित करण्यात येत आहे. यापूर्वी प्रदान करण्यात आलेल्या मान्यवर पुरस्कारार्थींची नावे पाठविण्यात येत आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराकरिता नांदेड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील पात्र कलाकारांच्या नावांची शिफारस (वैयक्तिक माहितीसह) 13 सप्टेंबर 1993 च्या शासन निर्णयात जोडलेल्या तपशीलाप्रमाणे mahaculture@gmail.com या ईमेल आयडीवर दिनांक 15 जुलै 2024 पर्यंत पाठवावे. आलेल्या शिफारशी समितीसमोर ठेवण्यात येईल, असे आवाहन सहसंचालक, सांस्कृतिक का...
“आम्ही जरांगे” हा चित्रपट गरजवंत मराठ्यांचा लढाच,सर्वांनी पाहन्यासारखा- माजी उपमहापौर सतिष देशमुख तरोडेकर -NNL

“आम्ही जरांगे” हा चित्रपट गरजवंत मराठ्यांचा लढाच,सर्वांनी पाहन्यासारखा- माजी उपमहापौर सतिष देशमुख तरोडेकर -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड। “संघर्ष बिगर काही खरं नसतं" हे अगदी खरंय आणि असाच एक कायापालट करणारा मराठ्यांचा संघर्ष आता “आम्ही जरांगे” च्या रुपाने मोठ्या पडद्यावर आपल्या भेटीला आलाय. तो मराठ्यांसह सर्व समाजाने पाहिला पाहिजे असे प्रतिपादन माजी उपमहापौर सतिष देशमुख तरोडेकर यांनी केले. आम्ही जरांगे - गरजवंत मराठ्यांचा लढा " या चित्रपटाच्या प्रिमियर शो माजी उपमहापौर सतिष देशमुख तरोडेकर यांनी भारत इ-स्केअर नांदेड येथे आयोजित केला. त्या दरम्यान पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेला चीत्रपटाचे निर्माते दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले, डॉ.दत्ता यशवंतराव मोरे, जरांगे पाटलाची भूमिका असलेले कलावंत प्रथ्वीराज थोरात,प्रियंका उबाळे,श्याम पाटील,दशरत कपाटे,नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे,श्याम कोकाटे,वैभव भोसले,शुभम देशमुख यांची उपस्थीती होती. या प्रीमिअर शो मधे विविध मराठा संघटना सहभागी झाल्या होत्या. गरजवंत म...
‘स्वारातीम’ विद्यापीठात घेता येणार ‘चित्रपट अभिनयाचे’ धडे -NNL

‘स्वारातीम’ विद्यापीठात घेता येणार ‘चित्रपट अभिनयाचे’ धडे -NNL

मनोरंजन, नांदेड
नांदेड| मनोरंजन क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तारत चालले आहे. त्यानुसार नाटक, चित्रपट, लघुचित्रपट, मालिका, वेबसिरीज, जाहिरात आदी क्षेत्रामध्ये प्रशिक्षित नट-कलावंतांची मागणीही वाढलेली आहे. भारतीय चित्रपट मोठ्या प्रमाणावर अंतरराष्ट्रीय मंचावर आपल्या देशाचा डंका वाजवताना पहायला मिळत आहे. मराठवाडा आणि विशेष करुन नांदेडच्या मातीतील कलावंतामध्ये प्रचंड उर्जा आणि कलागुण आहेत. गरज आहे ती शास्त्रशुध्द प्रशिक्षणाची आणि हिच गरज ओळखून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विषयाचे तंत्रशुध्द प्रशिक्षण देणाऱ्या स्कूल ऑफ फाईन अॅन्ड परफॅार्मिंग आर्टसने (नाट्य व चित्रपट विभाग) आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिल्म अॅन्ड टेलिव्हीजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, पुणे (FTII) या चित्रपट निर्मीतीचे प्रशिक्षण देणाऱ्या नामांकित संस्थेशी सामंजस्य करार केला. भारत सरक...
‘आम्ही जरांगे’…मराठा आरक्षणाची संघर्षगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर -NNL

‘आम्ही जरांगे’…मराठा आरक्षणाची संघर्षगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड। नारायणा प्रोडक्शन निर्मित आणि योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित 'आम्ही जरांगे' गरजवंत मराठ्यांचा लढा हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीस येत आहे. मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या ज्वलंत चळवळीला मोठ्या पडद्यावर या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. आणि आज नांदेड शहरात आम्हीं जरांगे या चित्रपटाची पुर्ण टीम प्रेक्षकांच्या भेटीला आली होती यावेळी नांदेड येथिल हॉटेल आकृती येथे पत्रकार परिषद घेऊन संवाद साधण्यात आला सोबतच सकल मराठा समाज बांधवाना हितगुज साधत चित्रपटाचं प्रोमोशन करण्यात आलं. यावेळी चित्रपटात 22 वर्षा चे जरांगे पाटील यांची भुमिका निभावणारे चित्रपटाचे नायक पृथ्वीराज थोरात तसेच चित्रपटाचे निर्माते डॉ दत्ता मोरे, कामाजी पवार,डॉ संजय कदम,पंजाब काळे पाटील,सौं कल्पना डोंगळीकर,नानाराव कल्याणकर,...
error: Content is protected !!