Thursday, May 14

मनोरंजन

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Enchanted with the singing of : ‘तेरे नाम का दिवाना….!’ च्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध -NNL

Enchanted with the singing of : ‘तेरे नाम का दिवाना….!’ च्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| कोजागिरी पौर्णिमेनिमित्त येथील आकाश प्रकाशन युट्यूब चॅनलच्या वतीने सप्तरंगी साहित्य मंडळाच्या ८८ व्या काव्यपौर्णिमा कार्यक्रमांतर्गत कविसंमेलनाचे आणि गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरातील व परिसरातील कवी, गायकांनी सहभागी होत जुन्या सुरेल गाण्यांची अविस्मरणीय बरसात केली. महागायक मोहम्मद रफी यांचे चाहते शंकर धोंगडे यांनी रसिकांना 'तेरे नाम का दिवाना....!' च्या गायनाने मंत्रमुग्ध केले. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जुन्या गितांचे गायन आणि कविसंमेलन हा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.‌ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गटशिक्षणाधिकारी डी. डी. सुपे हे होते. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, काव्यपौर्णिमेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, बालाजी थोटवे, आनंद वाघमारे, कवी पंडित पाटील बेरळीकर, साहित्यिक कवी विरभद्र मिरेवाड, ग...
Youth Festival : ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ युवक महोत्सवाच्या शोभा यात्रेतून मराठवाड्याच्या कला आणि संस्कृतीचे दर्शन -NNL

Youth Festival : ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ युवक महोत्सवाच्या शोभा यात्रेतून मराठवाड्याच्या कला आणि संस्कृतीचे दर्शन -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२४’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी शोभा यात्रेस प्रारंभ झाला. या शोभा यात्रेत विविध महाविद्यालयातून सहभागी स्पर्धक कलावंतानी सहभाग घेतला. या शोभा यात्रेत नांदेड, हिंगोली, परभणी व लातूर जिल्ह्यातील महाविद्यालयाने सहभाग नोंदविला. शोभायात्रेमध्ये मराठवाड्याची लोककला, लोकसंस्कृती, दिंडी, ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक या बरोबरच मतदान जनजागृती करीत ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ असा संदेश शोभा यात्रेतून दिला. शोभा यात्रेची सुरुवात विष्णूपुरी गावातील मारुती मंदिरापासून करण्यात आली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. यावेळी ...
Pani ; “अभिनेता आदिनाथ कोठारे याचा “पाणी”चित्रपट आज प्रदर्शित : नागदरवाडी” च्या बाबुराव केंद्रे याची जीवन कहाणी -NNL

Pani ; “अभिनेता आदिनाथ कोठारे याचा “पाणी”चित्रपट आज प्रदर्शित : नागदरवाडी” च्या बाबुराव केंद्रे याची जीवन कहाणी -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड। छकुला... छकुला .. छकुला... असा बँग राऊंड आवाज .... खोडकर मुलगा ....गिधाड गँग ..अतिशय मजेदार तितकाच खेळून ठेवणारा "माझा छकुला "हा १९९३ मध्ये आला आणि महेश कोठारे .लक्ष्मीकांत बेर्डे यां जोडीचा हा मराठी चित्रपट सुपरहिट ठरला.त्यातील "छोटा छकुला'म्हणजे आदिनाथ कोठारे यांनी लोहा तालुक्यातील नागदरवाडी या गावात 'पाणी'हा चित्रपट बनविला आहे.बाबुराव केंद्रे या भूमिपुत्रांच्या जीवनावर आधारित कथानक असलेला ",पाणी'आज १८ ऑक्टोबर रोजी राज्यभर प्रदर्शित होत आहे. नागदरवाडी "पाण्याची भीषण टंचाई ते पाणीच पाणी " झालेले गाव देशभरात पोहचले मराठी चित्रपट सृष्टीतील महेश कोठारे हे मोठे नाव.चार पाच वर्षा पूर्वी त्याचा" छोटा छकुला'आदिनाथ कोठारे हे लोहा तालुक्यातील नागदरवाडी गावात आले होते. त्यांनी "पाणी " नावाची डाक्युमेंट्री बनवली होती त्यास"राज्य क देशपातळीवर पारितोषिक मिळाले होते. लोहा तालुक्या...
Youth Festival : ‘ज्ञानतीर्थ -२०२४’ युवक महोत्सव दि. १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान होणार -NNL

Youth Festival : ‘ज्ञानतीर्थ -२०२४’ युवक महोत्सव दि. १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान होणार -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव यावर्षी सहयोग सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, विष्णुपुरी, नांदेड येथे दि. १८ ते २१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर हे भूषविणार असून, नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्या शुभहस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तसेच नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मीनल करणवाल यांची विशेष उपस्थिती असणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून कॉमेडीची बुलेट ट्रेन मधील विनोदी अभिनेत्री मा. प्राजक्ता हनमघर उपस्थित राहणार आहेत. ‘ज्ञानतीर्थ’ या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचे स्वागताध्यक्ष सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ. संतुकराव हंबर्डे असणार आहेत. या महोत्सवाचे पारितोषिक वितरण समारंभ दि. २१ ऑक...
Youth Festival : राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी क्रीडा विभागाची तयारी; जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक -NNL

Youth Festival : राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी क्रीडा विभागाची तयारी; जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| राज्य स्तरीय युवा महोत्सव विविध राज्यस्तरीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत आज पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी वेळेत व नियमानुसार सर्व स्पर्धांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले. आयुक्त क्रीडा विभाग सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने व जिल्हा क्रीडा परिषद नांदेड अंतर्गत सन 2024-25 मधील विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व राज्यस्तरीय महोत्सव आयोजन व नियोजन संदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीमध्ये सन 2024- 25 मधील राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा आर्चरी, बास्केटबॉल, विश्व बेसबॉल, बुद्धिबळ व सेपक टकरा व विनाअनुदानित राज्यस्तरीय खेळ स्पोर्ट्स व टेनिस हॉलीबॉल तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा बेसबॉल वयोगट 19 वर्षे मुले मुली व बुद्धिबळ 14 वर...
Dr. Manohar Chaskar : अभिनयातून मानवी अंतरात्मा व्यक्त व्हावा- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

Dr. Manohar Chaskar : अभिनयातून मानवी अंतरात्मा व्यक्त व्हावा- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| लोकभावना, वेदना आणि आकांक्षा व्यक्त करण्याचे सामर्थ्य नटाकडे असते. उत्तम अभिनयामुळे यशाची उत्तुंग शिखरे गाठता येतात. चांगला अभिनेता हा जनतेचा सूक्ष्मनिरीक्षक असतो, अभिनयातून मानवी अंतरात्मा व्यक्त झाला पाहिजे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी ‘फाउंडेशन कोर्स इन स्क्रीन अॅक्टींग’ प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या समारोप प्रसंगी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने ललित व प्रयोगजीवी कला संकुलामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट अभिनय प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा समारोप व पारितोषिक वितरण दि. १० ऑक्टोबर रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर उपस्थित होते. यावेळी कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, व्यवस्थापन परि...
President Draupadi Murmu ; ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते 70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान – NNL

President Draupadi Murmu ; ‘राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते 70 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान – NNL

मनोरंजन, मुंबई
नवी दिल्ली| 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आज विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ‘दादासाहेब फाळके जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान भवनात 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण विभागाचे सचिव संजय जाजू आणि पर्यवेक्षक समितीचे अध्यक्ष मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. आज प्रदान झालेले पुरस्कार वर्ष 2022 चे आहेत. ‘ममर्स ऑफ द जंगल’, ‘वारसा’, ‘या मराठी चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये सन्मानित करण्यात आले. फिचर फिल्म श्रेणीत 38 पुरस्कार जाहीर झाले. यात विविध भाषेतील उत्कृष्ट चित्रपटांचाही समावेश आहे. तर नॉन फिचर फिल्...
Geet gunjan ; किनवटमध्ये कलावंत शिक्षकांच्या “गीत गुंजन ” कार्यक्रमास उदंड प्रतिसाद -NNL

Geet gunjan ; किनवटमध्ये कलावंत शिक्षकांच्या “गीत गुंजन ” कार्यक्रमास उदंड प्रतिसाद -NNL

नांदेड, मनोरंजन
किनवट, परमेश्वर पेशवे। येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयातील सभागृहात अखिल भारतीय शिक्षक साहित्य , कला व क्रीडा मंडळ मराठवाडा विभागाच्या वतीने खास शिक्षकांसाठी कराओके गीत गायनाचा "गीत गुंजन " कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास कलावंत शिक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलतांना शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड असे म्हणाले की , संगीत हे असे औषध आहे त्यामुळे दुःख-वेदना दूर होतात. कलावंत शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये रमून जातो. म्हणून शिक्षकांनी आपली आवड जोपासली पाहिजे. शिक्षकांना हा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे मी कौतुक करतो. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे मानव विकास कार्यक्रम समन्वयक तथा स्तंभलेखक उत्तम कानिंदे, सेवानिवृत्त शिक्षक कलावंत वार्ताहर अनिल भंडारे उपस्थित  होते. मराठवाडा विभाग प्रमुख ...
Kalgeetura drama for Marathi lovers in Delhi : दिल्लीतील मराठी रसिकांसाठी कलगीतुरा नाटकाची रंगतदार मेजवानी – NNL

Kalgeetura drama for Marathi lovers in Delhi : दिल्लीतील मराठी रसिकांसाठी कलगीतुरा नाटकाची रंगतदार मेजवानी – NNL

मनोरंजन, नांदेड
नवी दिल्ली। नवी दिल्लीतील इंडियन हॅबिटॅट सेंटरच्या राष्ट्रीय स्तरावरील आयएचसी नाट्य महोत्सवात नाशिकमधील लोकप्रिय "कलगीतुरा" या संगीत नाटकाची निवड झाली आहे. हे नाटक २२ सप्टेंबर २०२४ रोजी, सायंकाळी ७ वाजता स्टेन ऑडिटोरियम येथे सादर होणार आहे. "कलगीतुरा" हे नाटक मराठी लोककलेचा अप्रतिम नमुना असून, नाटककार दया पाटील यांनी या नाटकाचे लेखन दहा वर्षांच्या संशोधनातून साकारले आहे.या संगीत नाटकाचे दिग्दर्शन सध्याच्या आघाडीच्या नाट्यदिग्दर्शक सचिन शिंदे यांनी केले आहे. तब्बल २२ कलाकारांचा सहभाग असलेल्या या नाटकात हेमंत महाजन, विमल ननावरे, निलेश सूर्यवंशी, अर्णव इंगळे, आणि ऋषिकेश शेलार यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील विविध भागांतील कलाकार भूमिका साकारत आहेत. नाटकाचे संगीत ऋषिकेश शेलार यांनी दिले असून, रोहित सरोदे यांनी संगीत संयोजन केले आहे. प्रकाशयोजनेची जबाबदारी चेतन बावडेकर यांनी सांभाळली आहे. या ...
film acting lessons in the university : विविध राज्यातील विद्यार्थी घेत आहेत विद्यापीठात चित्रपट अभिनयाचे धडे -NNL

film acting lessons in the university : विविध राज्यातील विद्यार्थी घेत आहेत विद्यापीठात चित्रपट अभिनयाचे धडे -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| उत्तरांचल, हरियाणा, कर्नाटक, पंजाब, उत्तरप्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र अशा विविध राज्यातून आलेले विद्यार्थी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजिवी कला संकुलात चित्रपट अभिनयाचे पाठ गिरवत आहेत. सकाळी नऊ ते रात्री नऊ अशा अत्यंत व्यस्त दिनक्रमामध्येही विद्यार्थी आनंदाने अभ्यास करत आहेत. पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात चित्रपट प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील ललित व प्रयोगजिवी कला संकुलात चित्रपट विषयक नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. एफटीआयआय सीएफओएलचे एक्झेकेटिव्ह हेड संदीप शहारे आणि कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी बुधवार (दि.२८) रोजी देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांशी हृद्य संवाद साधला. चित्रपट माध्मम...
error: Content is protected !!