Saturday, May 16

क्राईम

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Osmannagar Police ; वाळू उपसा करणाऱ्या २ क्रेन जप्त; ४ जणांवर गुन्हा उस्माननगर पोलिस पथकाची कामगिरी

Osmannagar Police ; वाळू उपसा करणाऱ्या २ क्रेन जप्त; ४ जणांवर गुन्हा उस्माननगर पोलिस पथकाची कामगिरी

क्राईम, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे l कौडगाव येथील जुन्या गावठाण जवळील गोदावरी नदी पात्रातून वाळूचा उपसा करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल झाला असून उस्माननगर पोलीस पथकाने वाळुसह २ क्रेन जप्त केल्या आहेत. यावेळी दोन बोट चालक बोट घेऊन फरार झाले आहेत . उस्मान नगर पोलीस ताण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, पोलिस हवालदार गंगाधर चिंचोरे, तुकाराम जुन्ने, प्रकाश पेदेवाड व होमगार्ड याचे पथक शीघ्र मोहिमेवर होते. २१ ऑगस्ट रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने कौडगाव येथील जुन्या गावठाण जवळील गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या वर छापा टाकला. पोलिसांना पाहताच्च २ बोट मालक गोदावरी नदी पात्रातून बोटी घेऊन पळून गेले. यापेळी पथकाने १० ब्रास वाळू (४२ हजार रुपये) २ क्रेन ४५ लाख रुपये जप्त केले.  पथकाने मुखेड तालुक्यंतील खैरका येथील क्रेन चालक व मालक पांडुरंग गोविंद मोरे, हैदराबाद र...
S.P. Avinash Kumar : हदगाव–हिमायतनगर तालुक्यावर माझे विशेष लक्ष राहील – पोलीस अधीक्षक अविनाश कुमार

S.P. Avinash Kumar : हदगाव–हिमायतनगर तालुक्यावर माझे विशेष लक्ष राहील – पोलीस अधीक्षक अविनाश कुमार

नांदेड, क्राईम
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव व हिमायतनगर तालुक्यात कोणतेही अवैध धंदे चालणार नाहीत. तसेच डीजेला अनावश्यक परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट मत नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी व्यक्त केले. २१ ऑगस्ट २०२५ रोजी हदगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीची बैठक व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार सुभाष वानखेडे, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, शिवसेना जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, गोपाळ सारडा, कृष्णा पाटील, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, महावितरणचे अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना पोलीस अधीक्षक अविनाश कुमार म्हणाले की, "गुन्हा हा साधा असो वा गंभीर, तो आता हलक्यात घेण्याची वेळ राहिलेली नाही. एका क्लिकमध्ये तुमचा संपूर्ण गुन्हेगारी इतिहास कंपन्यांना दिसतो. त...
Smugglers : माहूरमध्ये खवले मांजर या प्रजातीच्या वन्य प्राण्याचे तस्करी करांना पकडले

Smugglers : माहूरमध्ये खवले मांजर या प्रजातीच्या वन्य प्राण्याचे तस्करी करांना पकडले

क्राईम, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई यांनी दि १८ ऑगस्ट रोजी दिलेल्या गुप्त माहिती नुसार दुर्मिळ भारतीय खवले मांजर या प्रजातीच्या वन्य प्राण्याचे तस्करी होत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होताच उपवनसंरक्षक नांदेड केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनात किरण चव्हाण, स. व. स. रोहित जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी माहूर, प्रमोद राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी किनवट यांनी सापळा रचला या सापळ्यात खवल्या मांजरा सह आरोपीस जेरबंद केले. मिळालेल्या गुप्त माहितीवरून रचलेल्या सापळयात वनकर्मचारी व वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई चे कर्मचारी बनावट खरेदीदार च्या वेशात तयार झाले, सदर बनावट खरेदीदार यांना सुमारे ४ तास वेगवेगळी ठिकाणे फिरवल्यानंतर शेवटी आरोपी हे वनपरिक्षेत्र माहूर हद्दीतील मौजे मालवाडा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ अ लगत असलेल्या हिंदुस्थान पेट्रोल पंपाजवळ भे...
Sanjay Nilpatrewar : नदी-नाल्यावर सेल्फी घेणे धोकादायक – सपोनि संजय निलपत्रेवार यांचे आवाहन

Sanjay Nilpatrewar : नदी-नाल्यावर सेल्फी घेणे धोकादायक – सपोनि संजय निलपत्रेवार यांचे आवाहन

नांदेड, क्राईम
उस्माननगर, माणिक भिसे| नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या ठिकाणी हौशी तरुणांकडून सेल्फी घेण्याचे प्रकार घडत असून त्यामुळे जीव धोक्यात घालण्याचे प्रकार दिसून येतात. याबाबत उस्माननगर पोलिस स्टेशनचे सपोनि संजय निलपत्रेवार यांनी नागरिकांना इशारा देत आवाहन केले आहे की, नदी-नाल्यावर सेल्फी घेण्यासाठी जीव धोक्यात घालू नये, ज्या ठिकाणी पाणी प्रचंड वेगाने वाहत आहे तेथून जाणे टाळावे. सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांनी सावध राहण्याचे आणि धोका टाळण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे....
Samata Parishad : दलित महिला सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, समता परिषदेतर्फे निषेध !

Samata Parishad : दलित महिला सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, समता परिषदेतर्फे निषेध !

नांदेड, क्राईम
नांदेड| अहिल्यानगर जिल्ह्य़ातील दलित महिला सरपंचाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न गावगुंडांनी केला असून या जातीयवादी कृत्याचा अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेतर्फे जाहिर निषेध करण्यात येत आहे. अहिल्यानगर जिल्ह्य़ातील श्रीगोंदा तालुक्यातील सुरोडी या गावच्या सरपंच मीनाक्षीताई रामदास सकट ह्या धडाडीने पुढे होऊन गावाचा चांगला विकास करीत आहेत, हे गावातीलच कांही जातीयवादी गावगुंडांना देखवत नव्हते म्हणून त्यांनी सतत त्रास देण्याचा प्रयत्न केला. रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी मीनाक्षीताई सकट ह्या आपल्या वाहनातून जात असतांना रस्ता आडवून गावगुंडांनी पेट्रोल टाकून वाहन पेटवून दिले, त्यातून आपल्या लेकरासह उडी मारुन मीनाक्षीताईंनी जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. यात त्यांचे वाहन जळून खाक झाले. या बाबतीत अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी तीव्र संताप व्यक...
illegal sand transportation ; ऑपरेशन फ्लश आऊट अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या आरोपीसह हायवा पकडला

illegal sand transportation ; ऑपरेशन फ्लश आऊट अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या आरोपीसह हायवा पकडला

नांदेड, क्राईम
उस्माननगर l 15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.30 वा. सुमारास उस्माननगर ते नांदेड रोडवरील उदासी बाबि चौक रस्त्यावर हायवा चालकाला ताब्यात घेऊन पाच ब्रास रेतीसह हयावा मुद्देमाल जप्त उस्माननगर पोलीसांनी पकडली. ही गाडी चोरट्या पध्दतीची वाळू वाहतूक करत होती. प्रदीप शिवाजी राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हायवा क्रमांक एम.एच.46 बी.बी.9564 ची 15 ऑगस्ट रोजी रात्री तपासणी केली असतांना त्यामध्ये चोरट्या पध्दतीची वाळू भरलेली होती. 25 हजार रुपये किंमतीची 5 ब्रास वाळू आणि 25 लाखांची गाडी असा 20 लाख 25 हजारांचा मुद्देमाल उस्माननगर पोलीसांनी जप्त केला आहे. उस्माननगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस उपनिरिक्षक गजानन गाडेकर, पोलीस अंमलदार प्रदीप राठोड, तुकाराम जुने, प्रकाश पदेवाड, होमगार्ड भगवान केंद्रे, ओमकार पांचाळ यांनी ही कार्यवाही केली. या प्रकरणात येळी ता.लोहा येथील दिलीप व्यंकटी पवार...
Nanded Police Action : नांदेड पोलीसांची अवैध मसाज, स्पा सेंटर व लॉजेसवर धडक कारवाई – 16 आरोपी अटकेत

Nanded Police Action : नांदेड पोलीसांची अवैध मसाज, स्पा सेंटर व लॉजेसवर धडक कारवाई – 16 आरोपी अटकेत

नांदेड, क्राईम
नांदेड| मिशन निर्भया अंतर्गत नांदेड जिल्हा पोलीसांनी अवैध मसाज सेंटर, स्पा सेंटर व लॉजेसवर एकाच दिवशी धडक छापे टाकत 16 आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. अविनाश कुमार (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली वजिराबाद, भाग्यनगर, सोनखेड आणि माहूर पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आली. 🔹 वजिराबाद: The Fusion Spa येथे बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री करून 6 आरोपींना अटक. 🔹 भाग्यनगर: Red Oak Spa व एका घरावर छापा; एकूण 7 आरोपी अटकेत. 🔹 सोनखेड: पर्णकृषी पर्यटन केंद्रावर कारवाई; कॉलेज विद्यार्थ्यांचा सहभाग, 1 आरोपी अटकेत. 🔹 माहूर: राजश्री लॉज वर छापा; नोंदी व ओळखपत्राशिवाय रूम दिल्याप्रकरणी 2 आरोपी अटकेत. पोलीसांनी सांगितले की, यापुढे जिल्ह्यातील सर्व मसाज सेंटर, स्पा, लॉज, हॉटेल्स व कॉफी शॉप्सचे नियमित तपासणी होणार आहे. कुठल्याही अवैध व्यवसायाबाबत माहिती असल्यास स्ट्...
Rahul Salve ; रमाई आवास योजना पंतप्रधान आवास योजनेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करा – राहुल साळवे

Rahul Salve ; रमाई आवास योजना पंतप्रधान आवास योजनेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करा – राहुल साळवे

नांदेड, क्राईम
नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीमध्ये राज्य व केंद्र सरकारच्या वतीने बेघरांना पक्का निवारा मिळावा यासाठी पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेमधून घर बांधकामासाठी आर्थिक मदत दिली जाते व या योजनेसाठी खाजगी कंपनी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून योजना राबवण्यात येते परंतु गोरगरिबांना घरकुलाचा लाभ न देता श्रीमंत व शासकीय नोकरदारांचे नावे यादीमध्ये घेऊन त्यांनाच घरकुलाचा लाभ दिला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे आणि यासाठी महापालिकेचे कर्मचारी अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत. त्यामुळे सर्वे करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी व संबंधित महानगरपालिकेचे अधिकारी यांची त्वरित सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदन देऊन केली आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात घरकुल योजना राबवण...
illegal sand transport : अवैध रित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा हायवा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

illegal sand transport : अवैध रित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारा हायवा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

क्राईम, नांदेड
नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दुसऱ्या दिवशीही विष्णुपुरी येथील गोदावरी नदीच्या काळेश्वर मंदिर नवीन पुलाजवळ अवैध रित्या वाळू चोरणाऱ्या विना नंबर हायवा मधुन पाच ब्रास रेती असा 50 लाख मुद्देमाल जप्त करून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या कार्यवाही मुळे अवैध रित्या वाळू चोरणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैधरित्या गौण खनिजाची (रेती) चोरटी वाहतुक करणाऱ्या लोकांवर कारवाई करणे बाबत सर्व पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले आहे. त्या अनुषंगाने ओमकांत चिचोलकर पोलीस निरीक्षक ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी, अंमलदार पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली, त्यावरून दिनांक 14ऑगस्ट 25 रोजी 04.25 वाजता विष्णुपूरी जाणाऱ्या रोडवरील काळेश्वर मंदिराजवळील ...
Aghori crime news : नांदेडमध्ये अघोरी प्रकार…चोरीच्या संशयावरून दोघांना खाऊ घातला मंतरलेला नागेलीच्या पानाचा विडा…! व्हिडिओ व्हायरल

Aghori crime news : नांदेडमध्ये अघोरी प्रकार…चोरीच्या संशयावरून दोघांना खाऊ घातला मंतरलेला नागेलीच्या पानाचा विडा…! व्हिडिओ व्हायरल

क्राईम, नांदेड
नांदेड| जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात जादूटोनाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोरीच्या संशयावरून दोघांना मंतरलेल्या नागेलीच्या पानाचा विडा थंड पाण्यात बुडवून त्यात तांदूळ टाकून खाऊ घालण्यात आला आहे. या प्रकरणी रामतीर्थ पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जादुटोना प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाप लेकासह जादूटोना करणाऱ्या भोंदूबाबाचा देखील समावेश आहे. या अघोरी प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असुन या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सविस्तर माहिती अशी की, बिलोली तालुक्यातील केरूर गावात रामा नारायण आरोटे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. मागच्या महिन्यातील १९ जुलै रोजी त्यांच्या निवासस्थानी चोरी झाली होती. गावातील परमेश्वर राठोड यांच्यावर संशय होता. चोराचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांनी त्याला मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रामा आरोटे यांनी पोलीस ठ...
error: Content is protected !!