नांदेडराजकीय

MLA Shrijaya Chavan : आ. श्रीजया चव्हाण यांच्या पुढाकारातून १४.५० कोटींची विकासकामे मंजूर

नांदेड| भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांच्या पुढाकारातून विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी १४.५० कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली असून, याबाबतचे शासन निर्णय देखील निर्गमित झाले आहेत.

आ. श्रीजया चव्हाण यांनी सदर निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयान्वये भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकर व मुदखेड नगरपरिषद आणि अर्धापूर नगर पंचायतीला विशेष रस्ते अनुदान तसेच नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी एकूण १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून भोकर, मुदखेड व अर्धापूर शहरातील रस्ते व नाल्यांचे बांधकाम केले जाणार आहे.

त्याचप्रमाणे भोकर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी २.५० कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये पाणंद रस्ते,नळकांडी पूल तसेच गावांतर्गत नाल्यांचे व रस्त्यांचे बांधकाम,पुतळ्यांचे सुशोभीकरण, संरक्षक भिंतींचे बांधकाम, शेडची उभारणी आदी कामांचा समावेश असेल. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत भोकर विधानसभा मतदारसंघासाठी २ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या निधीतून पर्यटन स्थळाचा दर्जा मिळालेल्या अनेक गावांमध्ये सांस्कृतिक सभागृह व सभामंडपांची उभारणी केली जाईल.

माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर विधानसभा मतदारसंघासाठी १४.५० कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केल्याबद्दल आ. श्रीजया चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, पालकमंत्री अतुल सावे यांचे आभार मानले आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button