श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| मागील दोन-तीन वर्षांतील झालेल्या नाट्यमय राजकीय घडामोडी, पक्षांतर बदलांमुळे नेत्यांना लागलेला गद्दारीचा डाग अद्याप निघाला नसून निष्टावंत नागरिकांना व मतदारांना राजकिय नेत्यावर फारसा विश्वास राहिला नाही.त्यामुळे राजकारणातील निष्ठावंत चेहर्याचा शोध जनता घेत आहे. त्यातच आता विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने मतदारांचा रंग वाढलेला दिसत आहे.किनवट-माहूर मतदार संघातील ठिकठिकाणी माणसांचे गट निवडणूकसंदर्भात चर्चा करतांना दिसत असून ‘इस जंगलके हम दो शेर’या तिसरा कोई सिकंदर अशी विचारणा सुरू झाली असून आता महिनाभर चौकांसह चावडीवर राजकीय गप्पा रंगणार आहेत, हे निश्चित आहे.
किनवट-माहूर मतदार संघात महायुतीकडून विद्यमान आ.भीमराव केराम यांना उमेदवारी जाहीर होवून त्यांनी गुरुपुष्यामृत योगाच्या मुहुर्तावर उमेदवारी अर्ज देखील दाखल केले आहे.तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार प्रदीप नाईक यांना जाहीर झाल्याच्या बातम्या प्रसार माध्यमातून फिरत आहे. वंचीतकडून अंध समाजे नेते प्रा.विजय खुपसे यांना तिकिट बहाल झाली असल्याने हि निवडणुक मोठी रंगतदार होणार असल्याचे बोलल्या जात आहे.अशातच महाविकास आघाडीतील शिवसेना ( उबाठा ) कडून मागील ३५ वर्षापासून हिंदू ह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची कास हातात धरुण शिवसेनेचे गड आबादीत ठेवणारे विधानसभा क्षेञ प्रमुख तथा बहूजनाचा नेता म्हणून सर्व दूर परिचीत असलेले ज्योतिबा खराटे यांनी ही या विधानसभा मतदार संघातून आजी-माजी आमदाराला तिसरा पर्याय म्हणून निवडणूक लढवावी असा लोकआग्रह आता वाढतच चाललेला दिसत असल्याने खराटे हे काय भुमिका घेतील याकडे मतदार संघातील जनतेचे लक्ष लागले आहे.
ज्योतिबा खराटे यांनी जि.प.सदस्य असलेल्या तिन टर्मच्या काळात व प्रत्येकवेळी शेतकरी, कष्टकरी, मजूर, शेतीविषयक,विद्युत,शिक्षण तसेच आपल्या कार्यकर्त्यासाठी व बहूजन समाजाच्या प्रश्नावर आक्रमक भुमिका घेत व्यापक लढा देखील उभारलेला आहे. आज प्रत्येक इच्छुक आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असुन खराटे यांनी देखील अपक्ष उमेदवारीच्या झेंड्याखाली एक्कीची वज्रमुठ आवळून निवडणूकीच्या आखाड्यात उतरावे अशी मागणी सर्व सामान्य जनतेनू होवू लागली असून लोक आग्रह वाढल्याने आता खराटे काय भुमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाराजी नाट्यामुळे मतदार संघात महायुती व महाविकास आघाडीत अस्वस्थता
किनवट-माहूर विधानसभा क्षेत्रात राजकीय परिस्थिती वेगाने बदलत चालली आहे. भाजपाने उमेदवारी जाहिर केल्यापासून महायुतील काही शिंदेसेना व भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. आगामी होणार्या निवडणुकीत आ.हेमंत पाटील, जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर व माहूर शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांच्या नेतृत्वामध्ये जोपर्यंत पक्षश्रेष्ठींचा व वरिष्ठांचा आदेश येत नाही. तोपर्यंत युतीधर्मातील उमेदवाराचा प्रचार, राजकिय पोस्ट, बॅनरबाजी कोणतेच प्रकारचे समर्थन केल्या जाणार नाही.
याची शिवसैनिक, युवा सैनिक, शिवदूत, युवा सेना,तालुक्यातील शिंदेसेना पदाधिकारी, जेष्ठ नेते मंडळी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यासह सर्वांना व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे.त्यामुळे किनवट-माहूर मतदारसंघातील महायुतीचे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तीच अवस्था काहीसी महाविकास आघाडीत हि चालू असल्याची चर्चा आहे. महायुती आणि महाविकास आघाडी आमने-सामने असली तरी अपक्ष आणि बंडखोरी करून मैदानात उतरलेल्यांची उमेदवारी लढतींचे चित्र बदलू शकते. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडील नेत्यांना धास्ती लागली आहे.