हिमायतनगर| मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोज सोमवार संपूर्ण नांदेड जिल्हा व हिमायतनगर तालुका बंद ठेवण्याचं आव्हान सकल मराठा समाजाने केल आहे. याबाबतचे निवेदन हिमायतनगर पोलिसांना देण्यात आले असून, हिमायतनगर तालुका व शहर मार्केट बंद करून सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन मराठा यौध्दा मनोज जरांगे पाटिल हे अमरण उपोषणास मौजे अंतरवली सराटी येथे बसलेले आहेत. यास ५ दिवस झाले असताना शासनाने त्यांच्या उपोषणाची कोणतीही दखल घेतली नाही. त्यांच्या उपोषणास पाठींबा म्हणुन दिनांक २३ सोमवारी संपूर्ण नांदेड जिल्हा व हिमायतनगर तालुका बंद ठेवण्याचं आव्हान सकल मराठा समाजाने केल आहे. याबाबतचे निवेदन हिमायतनगर तालुका व शहरातील सकाळ मराठा समाज बांधवानी दिले आहे. या बंदला शहर व तालुक्यातील व्यापाऱ्यानी बाजारपेठ बंद ठेऊन तर नागरिकांनी यात सहभागी होऊन सहकार्य करावे.
मराठ्याचे क्रांतीसुर्य मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असून, शासनाने त्वरित त्यांच्या मागण्या मान्य करून आमरण उपोषण सोडवावे. अन्यथा नांदेडसह जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने हिमायतनगर तालुका व शहर बंद करून समाजाच्या न्याय हक्काची मागणी केली जाणार आहे.