हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा मराठवाडा संघटन मंत्री संजयभाऊ कौडगे तसेच भाजपा नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर बाळासाहेब देशमुख यांनी माहूर-किनवट दौरा केला.


या दौऱ्यादरम्यान हिमायतनगर येथील भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी दोन्ही मान्यवर नेत्यांची भेट घेऊन आदरपूर्वक स्वागत व सन्मान केला. त्यांच आगमन होताच फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली. या प्रसंगी कार्यकर्त्यांनी पक्ष संघटनाच्या बळकटीकरणावर चर्चा केली असून, स्थानिक नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाच्या झेंड्याखाली अधिकाधिक यश मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला.



यावेळी जिल्हा सरचिटणीस गजानन तुपतेवार, भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, पवन करेवाड, रामदास रायपलवार, परमेश्वर सूर्यवंशी, राम पाकलवार, नाथा पाटील, विनोद दुर्गेकर, सुरज दासेवार, गंगाधर मिरजगांवे, आदिसह हिमायतनगर शहर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




