नांदेड| पोलीस ठाणे बिलोली यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून बिलोली जि. नांदेड यांच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळया समोर रोडवरील घरात चोरी करणाऱ्या आरोपीना बिलोली पोलिसांनी आरोपीस अटक करून चोरीचा गुन्हा उघड केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंदयावर कार्यवाही करत मागील गुन्हे उघडकीस आणणे बाबत पोलीस निरीक्षक बिलोली यांना आदेशीत केले होते. नागोराव पिराजी भरांडे, वय 60 वर्षे रा.बामणी ता. बिलोली जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.क्र. व कलम गु.र.क्र.326 /2024 कलम 303 (2) बीएनएस अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळया समोर रोडवर चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधासाठी अतुल भोसले, पोलीस निरीक्षक बिलोली यांनी पथक तयार करून वर नमुद गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेताना दिनांक 03/12/2024 रोजी दुपारी गुप्त बातमीदार यांनी माहिती दिली की, नमुद गुन्हयातील आरोपी हे बिलोली शहरामधुन नर्सी नायगाव कडे त्यांचा ताब्यातील रिअर अॅटोमध्ये जात आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पो.नि अतुल भोसले यांनी पथकास तात्काळ रवाना केले. पथकाने अॅटोचा पाठलाग करून चिंचाळा पाटी येथे थांबवुन आरोपींना अॅटोसह ताब्यात घेतले.
आरोपी गौस बेग रफिक बेग, वय 28 वर्षे, व्यवसाय बेकार रा. वर्कशॉप निझाम कॉलनी, नांदेड, सुरज बापुराव कांबळे, वय 24 वर्षे, व्यवसाय अॅटोचालक रा. गौतमनगर, सांगवी बु. नांदेड यांच्याकडून नगदी 19,000 /- रूपये, 01 रिअर अॅटो क्र. एम.एच. – 26/ बीडी-6805 किंमती 2,00,000 /- रूपयाचा असा एकुण किंमती 2,19,000 /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील नमुद अधिकारी व अंमलदार यांनी उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.
हि कार्यवाही अविनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब नांदेड (IPS) श्री. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड रफिक शेख, उप विभागीय पोलीस अधिकारी, बिलोली यांचे मार्गदर्शनाखाली अतुल भोसले, पोलीस निरीक्षक, पोस्टे बिलोली ज्ञानेश्वर शिंदे, सपोनि, पोस्टे बिलोली पोहेकॉ / मारोती मुद्देमवार, सुनिल दस्तके, पोकॉ / व्यंकट घोंगडे, लक्ष्णम बच्चेवार यांनी केली आहे.