HomeनांदेडChikhli ; चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भूमिपुत्र आ.चिखलीकर यांनी दिली दोन...

Chikhli ; चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भूमिपुत्र आ.चिखलीकर यांनी दिली दोन एकर जागा दान

नांदेड l जिह्याच्या पर्यायाने राज्याच्या राजकारणात तगडा जनसंपर्क असलेले लोकप्रतिनिधी अशी ओळख असलेले आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे आपल्या जन्मभूमीचा विकास व्हावा यासाठी सामाजिक दायित्व निभावतात .त्याच्या चिखली या गाव ही त्यांना नेहमीच साथ मिळाली आहे.या गावात जागेअभावी प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहून शकेला नव्हते पण गावाच्या लगत असलेली स्वतःची दोन एकर जागा प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रतिभाताई प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दान दिली असून बुधवारी (२३ एप्रिल) त्या जागेचे रजिस्ट्री दानपत्र त्यांनी करून दिले आहे त्यामुळे चिखली (ता कंधार ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभासरणीचा प्रश्न सुटला आहे.

कंधार तालुक्यातील चिखली हे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची जन्मभूमी.त्यागावात बारावी पर्यन्त शिक्षणाची सोय त्यांनी उभारली आहे. शिवाय गावा लगतच नॅशनल हायवे गेला दळणवळणाची सोय व्हावी म्हणून मुख्य रस्त्याने राष्ट्रीय महामार्गाला गाव रस्त्यानी जोडले आहे.

आहे. गाव व आजूबाजूच्या खेड्यापाड्यासाठी आरोग्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून आणले पण जागे अभावी इमारत उभी राहू शकली नव्हती.

आमदार प्रतापराव पाटील यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाताई प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी चिखली (ता कंधार) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास स्वतःची दोन एकर जागा दान दिली आहे .त्याचे दान पत्र कंधार येथील रजिस्ट्री ऑफिस मध्ये करण्यात आके ते दस्त नोंदणीi जिल्हा आरोग्यअधिकारी संगीता देशमुख व कंधार उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार , याच्याकडे प्रतिभाताई यांनी सुपूर्त केले .प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी स्वतःची दोन एकर जागा दान दिली म्हणून जागाजिल्हा आरोग्य अधिकारी संगीता देशमुख यांनी प्रतिभाताई चिखलीकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .कंधारचे दुय्यम निबंधक सुनील रहाटकर उपस्थित होते.

आपल्या जन्मभूमीसाठी सामाजिक ‘ दायित्व’ निभावत आ प्रतावराव पाटील यांनी स्वतः ची दोन एकर जमीन प्राथमिक आरोग्यकेंद्राला दान दिली त्यामुळे भव्य दवाखाना होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून चिखली व आजूबाजूच्या वीस पंचवीस खेड्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत .चिखलीवासीयांनी आपल्या भूमीपुत्राला नेहमीच अडीअडचणीत समर्थपणे साथ दिली त्याच भूमिपुत्राने आपल्या गावासाठी
सुविधा व्हावी म्हणून दोन एकर जमीन दान दिली व सामाजिक दायित्व स्वीकारले आहे.या निर्णयाचे गावकऱ्यांनी स्वागत केले आहे

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments