Chikhli ; चिखली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भूमिपुत्र आ.चिखलीकर यांनी दिली दोन एकर जागा दान
नांदेड l जिह्याच्या पर्यायाने राज्याच्या राजकारणात तगडा जनसंपर्क असलेले लोकप्रतिनिधी अशी ओळख असलेले आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे आपल्या जन्मभूमीचा विकास व्हावा यासाठी सामाजिक दायित्व निभावतात .त्याच्या चिखली या गाव ही त्यांना नेहमीच साथ मिळाली आहे.या गावात जागेअभावी प्राथमिक आरोग्य केंद्र उभे राहून शकेला नव्हते पण गावाच्या लगत असलेली स्वतःची दोन एकर जागा प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रतिभाताई प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दान दिली असून बुधवारी (२३ एप्रिल) त्या जागेचे रजिस्ट्री दानपत्र त्यांनी करून दिले आहे त्यामुळे चिखली (ता कंधार ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभासरणीचा प्रश्न सुटला आहे.
कंधार तालुक्यातील चिखली हे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची जन्मभूमी.त्यागावात बारावी पर्यन्त शिक्षणाची सोय त्यांनी उभारली आहे. शिवाय गावा लगतच नॅशनल हायवे गेला दळणवळणाची सोय व्हावी म्हणून मु...
