नांदेड| आरोपी अभिजीत ऊर्फ अभय देवराव राऊत बेलानगर नांदेड, योगेश मारोती पवार रा. बरड शेवाळा ता. हदगाव जि.नांदेड यांच्याकडून तिन गुन्हयातील चोरीला गेलेल्या सोन्या चांदीचे दागीने, लॅपटॉप व दोन मोबाईल सह एकुण ३ लक्ष ७४ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन प्लश ऑऊट अंतर्गत फरारी व पाहिजे असलेल्या आरोपीचा शोध घेणेबाबत पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले होते. त्यानुसार दिनांक 09 जुलै 2025 रोजी भाग्यनगर हद्दितील गुन्हे शोध पथक भाग्यनगर हद्दित घर फोडीतील आरोपीचा शोध घेणेसाठी पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून भाग्यनगर गुरन 321/2025 कलम 331(4), 305 बि.एन.एस मधिल संशयीत आरोपी अभिजीत ऊर्फ अभय देवराव राऊत हा संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्याने सदर आरोपीस अटक केली.


त्याने पो.स्टे. भाग्यनगर हद्दितील गुरन 1) 321/2025 बि.एन.एस कलम 331 (4), 305, 317(2) 2) गुरन 387/2025 कलम 331(3), 331(4), 305 बी.एन.एस 3) 391/2025 कलम 331(3), 331(4),305 बी.एन.एस मधिल चोरीचा माल त्याचा मित्र योगेश मारोती पवार वय 20 वर्षे व्यवसाय मजुरी रा. बरडशेवाळा ता. हदगाव जी. नांदेड याचेकडे ठेवल्याचे सांगीतले. सदर ठिकाणी जावुन आरोपीची घरझडती घेतीली असता त्याचे घरात वरील तिन्ही गुन्हयातील माला पैकी सोन्या चांदीचे दागीने लॅपटॉप व दोन मोबाईल असा मुद्देमाल मिळुन आला. सदरचा मुद्देमाल जप्त केला असुन, गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे. आरोपीतांकडुन चोरीचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. या उत्कृष्ट कामगीरी बद्दल पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.


हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, श्रीमती अर्चना पाटील अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, सुशिलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष तांबे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भाग्यनगर, पोलीस निरीक्षक महेश माळी, गुन्हे शोध पथकाचे पोउपनी विनोद देशमुख, पोहेकॉ. प्रदिप गर्दनमारे, पोकों.विष्णुकांत मुंडे, पोकों. राहुल लाठकर, पोकों. नागनाथ चापके, पोकों.अंकुश कांबळे, पोलीस स्टेशन भाग्यनगर, नांदेड सायबर सेल नांदेडचे राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे आदींनी केली आहे.



