हिमायतनगर, आकांक्षा मादसवार| सिरंजनी येथील सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड यांच्या संकल्पनेतून गावातील सर्व भगिनीनी आपल्याला लाडकी बहीण म्हणून सन्मान देणाऱ्या मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना राखी पाठवून नातं सार्थक करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रियाळ राजाच्या मिरवणुकीत सर्व भगिनींनी एकत्र येऊन राख्या पाठविल्या याप्रसंगी काही महिलांनी वेड्या बहिणीची वेडी ही माया असे गीत सुद्धा सादर केले.
महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बहिणीचा सन्मान दिला. तेंव्हा आम्ही बहिणी सुद्धा आमच्या भाऊरायाच्या पाठीशी आहोत. अस्या प्रतिक्रिया महिला वर्गातून येत होत्या. आणि राक्षबंधांसाठी पाठविण्यात येणारी राख्यांची ही अनोखी भेट मुख्यमंत्र्यांना भारावुन टाकणारी नक्कीच असेल. सिरंजनी येथिल बहिणीने पाठविलेल्या पत्र जसेच्या तशे वाचकांसाठी देत आहोत.
प्रती,
एकनाथ दादा शिंदे,
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,
पवित्र राखी सणाच्या या शुभ प्रसंगी पत्र लिहिण्यास खूप आनंद होत आहे आम्ही सर्वजन सुखरूप आणि मजेत आहोत आपण सुद्धा सुखरूप असाल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. महाराष्ट्रातील सर्व महिलांना मुख्यमंत्र्याची बहिण म्हणून बहुमान मिळवून दिला, महाराष्ट्रात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बहिण मानून ओवाळणी पाठवण्याची व्यवस्था केली याबद्दल तुमचा आम्हाला अभिमान वाटत आहे आणि आदरणीय आनंद दिघे साहेबचं स्मरण होत आहे. त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार…
मौजे सिरंजनी ता. हिमायतनगर जि. नांदेड येथील आम्ही सर्व बहिणी मिळून तुमच्यासाठी राख्या पाठवत आहोत तरी आपण त्याचा मान ठेवून स्वीकार करावा. एक भाऊ म्हणून आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी राहु. घरातील वाड वडिलांना साष्टांग दंडवत व लहानांना खुप खुप आशीर्वाद….
…..सौ मेघा पवन करेवाड, सरपंच, ग्रामपंचायत सिरंजनी