श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। श्रावण महिन्यात अति पवित्र मानल्या जाणाऱ्या नारळी पौर्णिमा यात्रा उर्फ परिक्रमा यात्रेनिमित्त माहूरगडावर लाखोच्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने तसेच ही परिक्रमा यात्रा सर्व भाविक २२ की किलोमीटर सर्व देवस्थानासह जंगलातून पायी चालत पूर्ण करणार असल्याने दिनांक १४ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी सर्व विभाग प्रमुखांनी भाविकांना त्रास होणार नाही तसेच यात्रा काळात सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या


झालेल्या आढावा बैठकीत प्रमुख यात्रा प्रमुख म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी उपस्थिती होती यावेळी तहसीलदार किशोर यादव नातह डॉ. राजकुमार राठोड. उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे. सपोनी शिवप्रकाश मुळे. सपोनी एस. बी. गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर डी माचेवार. वैद्यकीय अधीक्षक डॉ बीपीन बाभळे. साबाचे अभियंता रवींद्र उमाळे. नपचे कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी. श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त तथा पुजारी चंद्रकांत भोपी. संजय कान्नव. व्यवस्थापक योगेश साबळे. मरावीमचे अभियंता आर बी शेंडे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापक जयस्वाल. एल आर तम्मजवार .आर एस गावंडे. नपचे अभियंता विशाल ढोरे. वन विभागाचे मिर साजिद अली. यांचे सह मान्यवर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या कर्मचाऱ्यांना सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांनी दोन दिवसात संपूर्ण रस्ता दुरुस्ती करणे पथदिवे चालू करणे तसेच भाविकांना कुठलीही अडचण होऊ नये म्हणून सर्व विभागांनी आपापली पथके कार्यरत ठेवण्याच्या सूचना केल्या तसेच एसटी महामंडळाला सक्त ताकीद देऊन नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे सांगितले .


येणाऱ्या लाखो भाविकांसाठी एसटी महामंडळाने ८० बसेस उपलब्ध करून देण्याची हमी दिली तर पोलीस वन विभाग आरोग्य विभाग यांचे सह सर्व विभाग प्रमुखांना आपापली जबाबदारी पार पाडण्याचे सांगून मंदिर प्रशासनांनी भाविकांना महाप्रसाद व शुद्ध पाणी तसेच पाऊस आल्यास निवाऱ्याची व्यवस्था सज्ज ठेवण्याचे सांगितले यावेळी बैठकीस अन्न व औषध प्रशासन दारूबंदी यासह अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गैरहजेरी वर त्यांनी नापसंती व्यक्त करून सदरील विभागांनी कर्तव्यात कसूर केल्यास त्यांचे विरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे यावेळी सांगितले.



