उस्माननगर l उस्माननगर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिष्ठित व्यापारी बालाजी दशरथ पाटील घोरबांड यांच्या वतीने येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांसह पत्रकार, शैक्षणिक, राजकीय , सामाजिक क्षेत्रात आणि पोलिस व महसूल प्रशासनात राहून सामाजिक बांधिलकी जोपासून सेवा हीच ईश्वर सेवा समजून विधायक कार्यक्रमात योगदान देणाऱ्या प्रतिष्ठित मान्यवरांचा श्री महारूद्र मंदिरात आयोजित हरीनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यातील काल्याच्या किर्तन सोहळ्यात महापुरुष व देवतांची फोटो आणि शाल , श्रीफळ, पुष्पहार घालून सत्कार करून गौरव करण्यात आला.


येथील श्री महारूद्र मंदीरात नुकताच अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भागवत कथाकार म्हणून साध्वी अमृतानंद सरस्वती माताजी अकोळनेर जि.अहमदनगर यांच्या रसाळ वाणीतून कथा ऐकण्यासाठी महीला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहुन आस्वाद घेतला.

अखंड हरिनाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथेच्या सांगताच्या काल्याच्या दिवशी ह.भ.प शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर ( संगित विशारद) यांच्या काल्याच्या किर्तन सोहळा दरम्यान येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते बालाजी दशरथराव पाटील घोरबांड यांनी समाज सेवा हीच ईश्वर सेवा समजून विधायक कार्यक्रमात सहभागी होऊन कार्य प्रभावीपणे राबवत असलेल्या विविध समाजातील नागरिक समाजाची सेवा करणाऱ्या पोलीस, सैनिक , ( जवान) , पत्रकार , प्रगतिशील शेतकरी , शैक्षणिक , राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या गावकऱ्यांचा एक आभिमान म्हणून व त्यांच्या जिद्द , चिकाटी , मेहनतीला प्रोत्साहन देण्यासाठी भाविक भक्तांच्या उपस्थितीत महापुरुष व देवदेवतांच्या प्रतिमेची फोटो , शाल , श्रीफळ पुष्पहार घालून गौरव करण्यात आला.यावेळी पंचक्रोशीतील भाविक भक्तांची गर्दी होती. त्यानंतर नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
