Tuesday, June 30

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
गवळी समाज संघटना तर्फे गुणवंत विज्ञार्थी सत्कार एवं मार्गदर्शन शिबीर संपन्न NNL

गवळी समाज संघटना तर्फे गुणवंत विज्ञार्थी सत्कार एवं मार्गदर्शन शिबीर संपन्न NNL

नांदेड
नांदेड| येथील गवळी समाज युवक संघटनेच्या शिक्षा मित्र यांच्यातर्फे गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि एक दिवसीय मार्गदर्शन शिबिर आज दि. ११ रोजी नरसिंह मंदिर, कौठा येथे यशस्वीरित्या संप्पन झाला. या शिबिरात उपस्थित गवळी समाजातील जवळपास १०० विधार्थी, विद्यार्थिनींना स्मृतिचिन्ह , श्रीमद भागवत गीता आणि पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शरद सीताराम मंडले तर प्रमुख अतिथी म्हणून दीक्षा अकॅडमीचे संचालक लक्ष्मीशंकर यादव, नांदेड विद्यापीठातील डॉ कैलाश यादव , नेहरू स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. ममता यादव, सहायक सरकारी अभिवक्ता सौ. प्रसन्ना रौत्रे , सी. ए. अखिलेश मंडले, ऍड हरिकिशन मंडले उपस्थित होते . यावेळी प्रास्ताविक करताना शिक्षा मित्र सुशांत यादव व दीपक यादव यांनी आतापर्यंत संघटनेने केलेल्या कार्याची माहिती दिली तदनंतर डॉ. कैलाश यादव यांनी उत्तीर्ण विध्य...
पुरातत्व विभागाने महाराष्ट्रातील ११ व्या शतकातील शिवमंदिराचा शोध लावला – NNL

पुरातत्व विभागाने महाराष्ट्रातील ११ व्या शतकातील शिवमंदिराचा शोध लावला – NNL

नांदेड, महाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर/नांदेड| महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील होट्टल गावात संवर्धनाच्या कामात पुरातत्व विभागाला शिवमंदिराची मूळ रचना सापडली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, चालुक्य काळातील मंदिरांसाठी प्रसिद्ध असलेल्या होट्टल येथे संवर्धनाच्या कामात पुरातत्व विभागाला तीन शिलालेख सापडले आहेत. शिलालेखांमध्ये 1070 च्या सुमारास या मंदिरांच्या बांधकामासाठी योगदान देणाऱ्या दानशूरांचा उल्लेख आहे. देगलूरपासून आठ किमी अंतरावर असलेल्या होट्टल हे ११ व्या शतकात चालुक्य राजाची उपराजधानी होती. ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी येथे 'हॉटेल महोत्सव' आयोजित केला जातो. या मंदिरांच्या संवर्धनासाठी राज्य पुरातत्व विभागाने सुमारे २१ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. सध्या सोमेश्वर मंदिर (नंदी मंदिर) आणि पाण्याच्या तलावाच्या जीर्णोद्धाराचे काम पुरातत्व विभागांतर्गत सुरू आहे. 1070 च्या सुमारास या मंदि...
हदगाव विधानसभा क्षेत्रांचे आ माधवराव पा.जवळगावकर यांच्या “त्या पञाची” दखल स्थानीय प्रशासन घेणार का..? – NNL

हदगाव विधानसभा क्षेत्रांचे आ माधवराव पा.जवळगावकर यांच्या “त्या पञाची” दखल स्थानीय प्रशासन घेणार का..? – NNL

नांदेड
हदगाव, शे.चांदपाशा| आ. माधवराव पाटील जवळगावकर पंधरा दिवसापुर्वी नादेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची खास दालनात भेट घेऊन हदगाव व हिमायतनगर तालुक्यात खरिप हंगामाकरिता जादा दराने बी-बियाणे व निकृष्ट दर्जाच बियाणे व खते विक्री होत असल्याच्या तक्रारी बाबतीत माहिती देऊन भरारी पथके नेमून शेतकऱ्यांची लूट होणार नाही यासाठी कठोर पाऊले उचलावीत अशी मागणी केली होती. मात्र हदगाव तालुक्यात बी-बियाणे-खत विक्रीत लूट होत असताना कृषी विभाग व भरारी पथके कागदावरच असून, एकही कार्यवाही झाली नसल्याने शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे शेतकरी कृषी संचालकाच्या ओझ्याखाली दाबून जात असल्याचे दिसून येत आहे. खुद्द आमदार महोदयांनी तक्रार देऊनही प्रशासनाने त्या पञाची दखल घेतली की..? नाही याची माहीती स्थानिक पातळीवर मिळत नाही. माञ कृषि विभागाकडुन बोगस बियाणे विक्री केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा ...
हिमायतनगर तालुक्यात नव्याने रूजू झालेल्या अधिकाऱ्याकडून जनतेचा भ्रमनिरास, अवैध वाळू वाहतुकीसह अवैध धंद्याना ऊत -NNL

हिमायतनगर तालुक्यात नव्याने रूजू झालेल्या अधिकाऱ्याकडून जनतेचा भ्रमनिरास, अवैध वाळू वाहतुकीसह अवैध धंद्याना ऊत -NNL

नांदेड
हिमायतनगर, दत्ता शिराणे| हिमायतनगर शहरांसह ग्रामीण परिसरात अवैध धंद्याना ऊत आला आहे. शहरात मटका, गुटखा, जुगार, अवैध वाहतूक यासह अनेक प्रकारचे अवैध धंदे बिनदिक्कत पणे चालू आहेत. व तसेच पैनगंगेवरील एकाही पेंडाचा लिलाव झाला नसल्याने वाळू तस्करांना रान मोकळे झाले असून दिवस रात्र वाळूचा उपसा होत असल्याने पैनगंगेचे पात्र धोक्यात आले आहे. व तसेच शहरात मोठ्याप्रमाणात दुर्गंधी वाढली असून नाल्याचा उपसा वेळेवर होत नसल्याने डासाच्या उत्पतीत मोठ्याप्रमाणात वाढ झाली असून पावसाळ्या अगोदर ची कामे ही झाली नसल्याने शहरात घानीचे साम्राज्य पसरले आहे. (disillusionment of the  public) गेल्या काही महिन्यांपुर्वी हिमायतनगर ला तहसीलदार म्हणून पल्लवी टेमकर या रूजू झाल्या आहेत. हिमायतनगर चा पदभार स्वीकारल्यानंतर त्या वाळू माफियांची दुकानदारी बंद करतील अशी आशा सर्वानाच वाटत होती. आणी विशेष म्हणजे गेल्या काही वर्षा...
हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर रक्तबंबाळ होऊन युवक गंभीर; युवकाला नांदेडला हलविले -NNL

हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर रक्तबंबाळ होऊन युवक गंभीर; युवकाला नांदेडला हलविले -NNL

क्राईम, नांदेड
सोनारी फाटा, शेख खय्युम। तालुक्यातील मौजे करंजी ते सरसम बु पुलावरील साईड भीतीच्या मध्ये रक्तबंबाळ अवस्थेत तरुण युवक आढळून आला आहे, तात्काळ पोलिसांनी त्यास हिमायतनगर येथे प्राथमिक उपचार करून नांदेड येथे पुढील उपचारासाठी हलविले आहे. गंभीर जखमी युवक हिमायतनगर तालुक्यातील मौजे पवना येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले असून, आशिष साईनाथ जाधव वय 28 रा असे युवकाचे नाव आहे. (in-himayatnagar-taluka-youths-are-seriously-injured-in-a-bloodbath-on-the-national-highway-the-youth-was-shifted-to-nanded) याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर-भोकर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे सरसम ते करंजी मधोमध असलेल्या पुलावरील साईड भीतीच्या मध्ये रक्तबंबाळ अवस्थेत तरुण युवक आढळून आला आहे. घटनास्थळी पोलीस पोचली असून, घटनास्थळ पंचनामा करून पाहणी केली असता दुचाकी, चपला व हाथोडी आढळून आली असून, कुणीतरी अज्ञाता...
राज्यातील महाभ्रष्टयुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा: नाना पटोले – NNL

राज्यातील महाभ्रष्टयुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा: नाना पटोले – NNL

Blog
मुंबई| राज्यातील जनता दुष्काळात होरपळून निघत असताना महायुती सरकारला त्याचे गांभीर्य नाही. लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात २६७ शेतकरी आत्महत्या झाल्या आणि निवडणुकीनंतरही या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. DBT च्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवल्या जाणारी खते, बियाणे, औषधे दिलेली नाहीत. टेंडर न काढताच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अव्वाच्या सव्वा किंमत वाढवून कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली, याला विरोध करणाऱ्या कृषी आयुक्तांना बाजूला करण्यात आले. सरकारने राज्यात टँकर माफिया तयार केले आहेत. ही सर्व परिस्थीती पाहता भ्रष्टाचारात बरबटलेल्या महायुती सरकारला सत्तेतून बाहेर काढून राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन दुष्काळ...
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही: नाना पटोले – NNL

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही: नाना पटोले – NNL

Blog
मुंबई| विधान परिषदेच्या चार जागांची निवडणूक एकत्र लढवण्याचा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसचा विचार आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क केला परंतु संपर्क होऊ शकला नाही. अर्ज मागे घेण्यास अजून वेळ असून लवकरच यावर निर्णय होईल, अशी आशा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, कोकण, मुंबई व नाशिक पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून निवडणुका होत आहेत. विधान परिषदेच्या कोकण पदवीधर व नाशिकच्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने जाहीर केली होती. परंतु शिवसेनेने परस्पर कोकण, नाशिक व मुंबई मतदार संघासाठीचे उमेदवार जाहीर केले. विधान परिषद निवडणुकीचा निर्णय एकत्र बसून केल्यास महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे चांगले यश मिळू शकेल यासाठी काँग्रेसचा प्रयत्न ...
15 जून रोजी “जागतिक वृद्ध (ज्येष्ठ) नागरिक अत्याचार तथा दुर्व्यवहार जागृती दिन” साजरा केला जाणार डाॅ.हंसराज वैद्य – NNL

15 जून रोजी “जागतिक वृद्ध (ज्येष्ठ) नागरिक अत्याचार तथा दुर्व्यवहार जागृती दिन” साजरा केला जाणार डाॅ.हंसराज वैद्य – NNL

नांदेड
नांदेड| वृद्ध अर्थात ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा एक अत्यंत महत्वाचा आणि अविभाज्य असा घटक आहे.ज्येष्ठ नागरिक हा एकूनच समाजाला व समाज मनाला यथा योग्य आकार देणारा शिल्पकारच आहे! जसा शिल्पकार, तेसे मंदिर आणि मंदिरातली मूर्ती! अर्थात वृद्ध(ज्येष्ठ) हा समाजाचा एक कल्पक तथा कलात्मक रचणाकारच म्हणता येईल! ज्येष्ठ नागरिकांना सर्व सामान्य पणे कुटूंबात, समाजात, शासनात आणि प्रशासनातही म्हणावी तशी सन्मानाची, कृतज्ञतेची, सहानुभूतीची तथा माणूस्कीची वागणूक मिळताना दिसत नाही. ज्येष्ठांची पिळवणूक तथा प्रतारणा केली जाते. त्यांनां तुच्छतेची वागणूक दिली जाते. छळ केला जातो.! त्यांचा वापर करून घेतला जातो! ही बाब जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत चर्चिली गेली. वृद्धांवरील (ज्येष्ठ नागरिकां वरील) अन्याय, अत्याचार, अनादर, अडवणूक,तुच्छतेची वागणूक,त्यांचा छळ या गोष्ठींनां कुठे तरी आळा तथा लगाम लागायला हवा ...
उन्हाळी सुट्यात सुरु झालेली नांदेड-हडपसर-नांदेड विशेष गाडी रद्द – NNL

उन्हाळी सुट्यात सुरु झालेली नांदेड-हडपसर-नांदेड विशेष गाडी रद्द – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड-हडपसर-नांदेड विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे अशी माहिती नांदेड डिव्हिजन रेल्वे विभागाच्या जनसंपर्क विभागाने जारी केली आहे. उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड- हडपसर-नांदेड विशेष गाडीच्या 12 फेऱ्या मंजूर केल्या होत्या. या गाडीस प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभल्यामुळे या गाडीच्या उरलेल्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 1. नांदेड-हडपसर साप्ताहिक विशेष गाडी च्या 03 फेऱ्या रद्द : गाडी क्रमांक 07623 हुजूर साहिब नांदेड ते हडपसर विशेष गाडी दिनांक 12, 19 आणि 26 जून, 2024 ला दर बुधवारी नांदेड रेल्वे स्थानकावरून रात्री 21.00 वाजता सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. 2. हडपसर - नांदेड साप्ताहिक विशेष गाडीच्या 03 फेऱ्या रद्द : गाडी क्रमांक 07624 हुजूर साहिब नांदेड ते हडपसर विशेष गाडी दिनांक 13,20, आणि 27 जून, 2024 ला दर गुरुवारी हडपसर ...
अखर्चित निधी प्रकरणी किनवट तालुक्यातील बोधडी ग्रामपंचायत कारणे दाखवा नोटीस -NNL

अखर्चित निधी प्रकरणी किनवट तालुक्यातील बोधडी ग्रामपंचायत कारणे दाखवा नोटीस -NNL

नांदेड
किनवट,परमेश्वर पेशवे। बोधडी खुर्दकरांना १५ वा वित्त ग्रामपंचायत स्तर आयोगाचा १ कोटी ३५ लाखावर भौतिक मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी निधी दिल्यानंतरही सरपंच आणि ग्रामसेवकाच्या अक्षम्य कर्तव्य चुकार पणामुळे ९९,६२,९१८ रुपये अखर्चित ठेवून नागरीकांना विकासापासून दूर ठेवल्या प्रकरणी गटविकास अधिकारी वैष्णवांनी ७ जून ऐन मृगनक्षत्रावर कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. तीन दिवसात आर्थिक व भौतिक अहवाल प्रत्यक्ष सादर न केल्यास कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत. (ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ अनुसार) कारवाई प्रस्तावित करण्याचा आणि ग्रामसेवकाविरुद्ध सेवाशिस्तभंग प्रकरणी कारवाईचा ईशारा देण्यात आल्याने एकच धांदल उडाल्याची सर्वत्र चर्चा ऐकायला मिळते. लोकसंख्येच्या आधारावर लोकांना मुलभूत नागरी भौतिक सुविधा पुरवून विकासाच्या मुख्य प्रवाहात गाव यावे यासाठी शासनद्वारा बोधडी खुर्दसाठी २०२० पासून ते २०२४ मार्च ...
error: Content is protected !!