औराळा (प्रतिनिधी) अनेक वर्षांपासून बंद असलेली औराळा–सुजलेगाव–नायगाव–नरसी बस सेवा खासदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून पुन्हा सुरू झाली आहे. या बस सेवेच्या आगमनाने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.



बससेवेच्या शुभारंभप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक सुर्यकांत दमकोंडावार, हाणमंत सोमवाड, पोशट्टी कानगुले, माजी सरपंच नारायण पांचाळ, माधव पांचाळ, मनोहर पांचाळ यांच्या हस्ते नारळ फोडून पूजन करण्यात आले. यावेळी बस चालक श्री. कदम यांचा सत्कार माजी सरपंच सोपान गायकवाड यांनी केला.


गावात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बससेवा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ग्रामस्थांनी खासदार चव्हाण यांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी साईनाथ पा. पांढरे (उपसरपंच औराळकर) तसेच मौजे औराळा येथील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



