हदगाव, शेख चांदपाशा| विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हदगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधीसह काही विविध पक्षाचे राजकीय नेते हजेरी लावत आहेत. माञ स्थानिक प्रशासनावर लोकप्रतिनिधीची जी वचक असायला हवी ती दिसुन येत नाही. काही नेते मंडळी निवडणूका जाहीर होण्यापूर्वी हदगाव विधानसभा क्षेञातुन निवडणूक लढविण्यात इच्छुक आसल्याच दिसुन येत आहे. जनतेच्या कठीण समयी माञ हे नेते कुठे गायब असतात असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिक करतांना दिसुन येत आहे.
हदगाव तालुक्यातील गावात अनेक नवीन प्राथमिक आरोग्य केद्राच इमारती बाधण्यात आलेल्या आसतांना तिथे अध्यापही आरोग्य केद्र सुरु करण्यात आलेलं नाही. हदगांव शहरातील उपजिल्हा रुग्णालय मध्ये अनेक ञुटी असुनही त्याकडे लोकप्रतिनिधी का..? लक्षदेत नाहीत. रक्ताचे नमुने उपजिल्हा रुग्णाल्यातून ५० किमी दुर आसलेल्या हिमायनगर तालुक्यातुन दुसऱ्या किवा तिसऱ्या दिवशी येतो. शहरातील उपजिल्हा रुग्णालय मध्ये रक्तपेढी पण नाही हि किती लाजवरणी बाब आहे. तहसिल कार्यालयाला गेल्या दिड वर्षापासून पुरवठा अधिकारी नाही. शहरातील गटशिक्षण अधिकारी कार्यालय हे पाण्यात आहे. या बाबतीत आनेक वेळा तेथील अधिका-यानी मागणी करुनही त्याची पुर्तता होत नाही.
फार दुर्मिळ कागद पञे भिजण्याची शक्यता असतानाही दुर्लक्ष.. इतकेच नव्हे तर शहरात दोन आडीच वर्षापुर्वी माजी मुख्यमंत्री आशोक चव्हाण यांच्या हस्ते जलशुद्धीकरण प्रकल्पाचे उदघाटन थाटात झाले होते. या प्रकल्पातुन एक बादली भर शुद्धपाणी पण मिळाले नसल्याची माहीती आहे.अश्या एक ना आनेक समस्या आसतांना माञ लोकप्रतिनिधी ह्या समस्यांचाकडे लक्ष न देता भलत्याच कामात ते गुंतले असल्याने सर्वसामन्याच प्रश्नांना माञ ‘खो’ मिळत आहे. दुसरी अणखी गंभीर बाब अशी की, शहरातील स्टेट बॅक ऑफ इंडीयाच्या शाखेचे कर्ज मंजूरीचे फायली हदगांव शहरापासून १०० किमी असलेल्या किनवट शाखेतून मंजूरी मिळून आणावी लागते आहे. या बाबतीत तात्कालीन खासदार व विद्यमान खासदार यांना इथल्या शेतकऱ्यानी अनेक वेळा त्यांच्या कानावर ह्या बाबी टाकल्या तरी ह्या जीवलग बाबीकडे लक्ष देण्यात येत नाही. अशी त्रस्त शेतक-यांची मागणी अनेक दिवसा पासून प्रलंबित आहे.