हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर (वाढोणा) येथील नगरपंचायत पदग्रहण सोहळ्यानिमित्त प्रभाग क्रमांक १० मधील सर्व मायबाप जनतेच्या आशीर्वादाने व भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सहकार्यामुळे भाजपचे उमेदवार आशिष बाबुराव सकवान हे मताधिक्याने निवडून आले. गुरुवारी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर नगरसेवकपदाचा बहुमान मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.


नगरपंचायत निवडणुकीत विजय मिळवल्या नंतर, नगरपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात नगराध्यक्ष रफिक सेठ व सर्व नगरसेवक यांच्या आयोजित पदग्रहण सोहळ्यात वॉर्ड क्रमांक 10 चे भाजपा नगरसेवक आशिष सकवान यांचा आणि त्यांचे वडील बाबुराव सकवान यांचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी श्री. ताडेवाड यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. राजेंद्रजी वानखेडे, तसेच लोकनियुक्त नूतन नगराध्यक्ष रफिक शेठ, श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.


सन्मान स्वीकारल्यानंतर आशिष सकवान म्हणाले की, “नगरसेवक पदाचा हा बहुमान मला वडिलांच्या कृपाशीर्वादाने आणि जनतेच्या विश्वासामुळे मिळाला आहे. प्रभाग क्रमांक १० मधील प्रत्येक नागरिकाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. हा सन्मान माझा वैयक्तिक नसून माझ्या प्रभागातील सर्व मायबाप जनतेचा आहे.”

या निवडीमुळे प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपची ताकद अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात रस्ते, नाल्या, स्वच्छता, पाणी समस्या अन्य विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

